ट्रम्पनं ब्रिटनला फटकारलं? 'दिएगो गार्सिया' बेटावर अमेरिकेचा दावा

Trump Diego Garcia Military Base Strategy: ग्रीनलँडनंतर ट्रम्प यांनी आता दिएगो गार्सिया या बेटावर लक्ष केंद्रीत केलयं.... मात्र ट्रम्प यांना हे बेट नेमकं का हवं आहे? या बेटाचं भारतासाठी काय महत्त्व आहे?
Trump discusses Diego Garcia base as British Prime Minister Keir Starmer looks on.
Trump discusses Diego Garcia base as British Prime Minister Keir Starmer looks on.Saam Tv
Published On

ग्रीनलॅंडबाबतच्या आक्रमक भूमिकेनंतर आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा हिंदी महासागराकडे वळवलाय...हिंदी महासागरातील 'दिएगो गार्सिया' बेटावर अमेरिकेनं दावा ठोकलाय... ट्रम्प यांना दिएगो गार्सिया हे बेट नेमकं का हवं आहे? आणि त्यावरून त्यांनी ब्रिटनला कसं फटकारलं पाहूयात...

दिएगो गार्सिया'चं महत्त्व काय?

हिंदी महासागरातील 'दिएगो गार्सिया' हे बेट सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे

अमेरिका आणि ब्रिटनचा संयुक्त लष्करी तळ याच बेटावर

2025 मध्ये ब्रिटनकडून कराराद्वारे चागोस द्वीपसमूहाची मालकी मॉरिशसकडे

बेटावरील लष्करी तळ पुढील 99 वर्षांसाठी ब्रिटनच्या ताब्यात ठेवण्याची अट

कराराला आधी अमेरिकेचाही पाठिंबा, मात्र सुरक्षेच्या मुद्द्यावरून ट्रम्प आक्रमक

बेट मॉरिशसला देणं हा ब्रिटनचा मोठा 'मूर्खपणा' असल्याचं ट्रम्प यांचं मत

बेट सोडल्यामुळे चीन आणि रशिया या परिस्थितीचा फायदा घेतील, असा ट्रम्पचा दावा

बेट गमावणं ही राष्ट्रीय सुरक्षिततेची मोठी चूक

हा करार राष्ट्रीय सुरक्षेसाठीच केला गेला असल्याचं ब्रिटननं सांगितलं असलं तरी ट्रम्प यांच्या दाव्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासमोर नवं आव्हान उभं राहिलयं.. त्यात भारतानही ब्रिटन-मॉरिशस कराराला पाठिंबा दिलाय.. हिंदी महासागरातील वसाहतवाद संपवण्यासाठी हे महत्वाचं होतं अशी भूमिका भारतानं मांडली आहे.. चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी दिएगो गार्सियावर अमेरिकेचा तळ असणं हे भारताच्या दृष्टीनंही महत्त्वाच असणार आहे. त्यामुळे आता ट्रम्प आणि ब्रिटन यासंदर्भात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com