Israel Iran War: इस्त्राईल करणार खोमेनींचा खात्मा? ट्रम्पनं रोखली खोमेनींची हत्या? नेत्यान्याहू ट्रम्पचा आदेश धुडकावणार?

Middle East on the Brink: इस्त्राईलने आता थेट इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनींच्या हत्येचा प्लॅन आखलाय.. मात्र खोमेनींच्या मदतीला अमेरिका धावलीय.. डोनाल्ड ट्रम्प यांनी खोमेनींची हत्या कशी रोखली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Khamenei
Khamenei saam tv
Published On

इस्त्राईलने इराणच्या टॉप कमांडर आणि अणू शास्त्रज्ञांची हत्या केल्यानंतर आपला मोर्चा थेट इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनींकडे वळवलाय... तर खोमेनी आमच्या निशाण्यापासून दूर नसल्याचा इशाराच इस्त्राईलने दिलाय..मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खोमेनींची हत्या रोखल्याची माहितीच समोर आलीय..

ट्रम्प यांनी का रोखली खोमेनींची हत्या?

इराणने अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केलं नाही

त्यामुळे खोमेनींना लक्ष्य करणं योग्य नसल्याचं मत

खोमेनींची हत्या झाल्यास मध्य पूर्वेतील अमेरिकन तळ संकटात सापडण्याची शक्यता

खोमेनी शिया समुदायाचे सर्वोच्च नेते असल्याने भीषण युद्ध होण्याची भीती

खोमेनींच्या हत्या झाल्यास युद्धात रशिया, चीन उडी घेण्याची शक्यता

2023 मध्ये इस्त्राईल विरुद्ध पॅलेस्टाईन संघर्ष पेटला... त्यादरम्यानच इराणचे राष्ट्रपती

इब्राहिम रईसींची हत्या झाली होती.. त्यावेळी हत्येमागे इस्त्राईल असल्याचा आरोप खोमेनींनी केला होता.. त्याचा बदला घेण्यासाठी इराणने इस्त्राईलवर जोरदार हल्ले करत युध्दात एण्ट्री केली.. त्यानंतर इराण विरुद्ध इस्त्राईलमधील विस्तव काही जात नव्हता... त्यातच अचानक इस्त्राईलने इराणची राजधानी दामास्कस सह इराणच्या अणू केंद्रावर हल्ला करुन युद्धाचं रणशिंग फुंकलं... एवढंच नाही तर मोसादने इराणचे 13 टॉप कमांडर आणि अणू शास्त्रज्ञांचीही हत्या केल्याचं समोर आलंय.. त्याला इराणने तैल अविवसह इस्त्राईलवर हल्ले करुन उत्तर दिलंय.. त्यामुळे मध्य पूर्व युद्धाच्या आगीत बेचिराख होण्याच्या मार्गावर असतानाच इस्त्राईलचे पंतप्रधान बेन्झामिन नेत्यान्याहूंनी ट्रम्प यांच्या हत्येचा इराण कट रचत असल्याचा आरोप केला... एवढंच नाही तर इस्त्राईलने आता इराणच्या सर्वोच्च नेत्याची हत्या करण्याचा इशाराही दिला.. ट्रम्प यांनी खोमेनींची हत्या न करण्याबाबत इस्त्राईलला सूचना दिल्या आहेत... मात्र नेत्यान्याहू ट्रम्प यांचा आदेश मानणार की खोमेनींचीही हत्या करुन जगाला युद्धाच्या भीषण खाईत लोटणार? याकडे जगाचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com