Terrorist Attack: हाऊज द जोश! भारतीय जवानांनी करून दाखवलं; सैन्यदलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Terrorist Attack: जम्मू काश्मीरच्या अखनूरमधील एलओसीवर भारतीय सैन्याच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झालाय.
Terrorist Attack: सैन्य दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची मोठी कारवाई
Terrorist Attack On Army Convoy
Published On

जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या ताफ्यावर गोळीबार केलाय. यात हल्ल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून शोध मोहीम राबवली जात आहे. दहशतवादी हल्ल्याची घटना अखनूरच्या बटाल गावातील शिव मंदिराजवळ घडली. ३२ फील्ड रेजिमेंटने परिसरात वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केलीय.

साधरण तीन ते ४ दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. हे दहशतवादी तेथील एका मंदिराभोवती लपून बसलेत. हाती आलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झालेत.

हल्ल्यानंतर परिसरात नाकेबंदी

या दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) यांच्या पथकांनी मिळून शोध मोहीम सुरू केलीय. सध्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घात घालून बसलेल्या तीन दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार केला.

लष्कराच्या जम्मू स्थित व्हाईट नाइट कॉर्प्सने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सांगितले की, दहशतवाद्यांनी सकाळी लष्कराच्या वाहनांच्या ताफ्यावर गोळीबार केला. दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाल्यानंतर आमच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं असून दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी शोधमोहीम सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Terrorist Attack: सैन्य दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची मोठी कारवाई
Agnipath Scheme: अग्निपथ योजना बंद होणार? NDA सरकार घेणार मोठा निर्णय

जम्मू-काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील गगनगीर येथे गेल्या एक वर्षापासून घुसखोरी चालू आहे. येथील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाळत ठेवणारी यंत्रणा चुकवून घुसखोरी होत असल्याची माहिती समोर आलीय. गुप्तचरांचा अभाव पाहून दहशतवादी भारतात घुसखोरी करत आहेत. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. गगनगीर येथे झालेल्या हल्ल्यात स्थानिक डॉक्टर आणि बिहारमधील दोन मजुरांसह सात जणांना जीव गमवावा लागला होता.

Terrorist Attack: सैन्य दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची मोठी कारवाई
baramulla blast : कोर्टाच्या आवारात फुटला ग्रेनेड बॉम्ब; परिसरात उडाली एकच खळबळ, नागरिकांची धावाधाव

ही घटना २० ऑक्टोबर रोजी घडली होती. गगनगीर हल्ल्याने काश्मीरमधील स्थानिक तरुणांच्या दहशतवादी गटांमध्ये सामील होण्याच्या "सुप्त प्रवृत्ती"बद्दल चिंता वाढवलीय. झेड-मोर बोगद्याच्या बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात दोन दहशतवाद्यांचा सहभाग होता. त्यापैकी एकाची ओळख पटलीय. हा तरुण दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथील रहिवाशी आहे. हा तरुण २०२३ मध्ये दहशतवादी गटात सामील झाला होता, तर दुसरा पाकिस्तानमधून आल्याचं सांगितलं जातं आहे. दरम्यान सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्थानिक तरुण झपाट्याने कट्टरतावादाकडे जात आहेत, ही चिंतेची गोष्ट आरहे. अशा तरुणांना ओळखण्यासाठी खबऱ्याच्या नेटवर्कच्या गरजेवर भर दिला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com