देवीच्या जागरण कार्यक्रमातून परतताना भीषण अपघात! २ कारची समोरासमोर धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

Tragic Road Accident in Haryana: हरियाणात कुरुक्षेत्र रोडवर भीषण अपघाताची घटना. २ वाहनांची एकमेकांना जोरदार टक्कर. 5 ठार, अनेक जखमी.
Tragic Road Accident in Haryana
Tragic Road Accident in HaryanaSaam
Published On
Summary
  • कुरूक्षेत्र रोडवर भीषण अपघात.

  • वाहनांची समोरासमोर धडक.

  • ५ जणांचा जागीच मृत्यू.

हरियाणाच्या कुरूक्षेत्र परिसरात दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. दोन भरधाव वाहनांची समोरासमोर टक्कर झाल्यानं मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, अनेक जण जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

कुरूक्षेत्र कैथल रोडवर हा भीषण अपघात घडल्याची माहिती आहे. सकाळच्या सुमारास दोन भरधाव वाहने समोरासमोर आदळली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच खिडकीतून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

Tragic Road Accident in Haryana
'तटकरेंसारख्या xxx..' महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; शिंदे गटाच्या आमदाराची दादांच्या खासदारावर जहरी टीका

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण देवीच्या जागरण कार्यक्रमातून परतत होते. मृत व्यक्ती यमुनानगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. हा अपघात पिंडारसी आणि घराडसी या गावांदरम्यान घडली आहे. मृतांमध्ये चालक प्रवीण पुत्र स्वराज वासी बूबका, पवन पुत्र बालकिशन, राजेंद्र पुत्र बालकिशन, उर्मिला पत्नी पवन आणि संजयची पत्नी सुमन यांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Tragic Road Accident in Haryana
आधी बायकोला संपवलं, नंतर नवऱ्यानं आयुष्याचा दोर कापला; मित्राला VIDEO पाठवत म्हणाला.. इंजिनिअर कपलचा दुर्देवी अंत

या अपघातात वंशिका, संतोष, लीला देवी, ऋषिपाल, करम सिंग, प्रवीण, जीता राम हे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या भीषण अपघाताच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com