Tragic Incident: शेकोटीनं घेतला जीव; हॉटेलच्या रुममध्ये ५ जणांचा गुदमरुन मृत्यू

Five Killed in Kurukshetra Hotel Room: हरियाणातील कुरुक्षेत्र येथील एका हॉटेलच्या रुममध्ये पाच जणांचा मृतदेह आढळून आलेत. हे सर्वजण उत्तर प्रदेशातील स्थलांतरित कामगार होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
Five Killed in Kurukshetra Hotel Room:
Hotel room in Kurukshetra where five people reportedly died due to suffocation caused by coal heater smoke.saam tv
Published On
Summary
  • शेकोटीचा धूर जीवघेणा ठरला

  • उत्तर प्रदेशातील पाच जणांचा श्वास गुदमरून मृत्यू

  • थंडीपासून बचावासाठी वापरलेली कोळशाची शेकोटी ठरली कारण

एका हॉटेलच्या रुमध्ये कोळशाच्या शेकोटीतून निघणाऱ्या धुराने पाच जणांचा जीव घेतलाय. ही धक्कादायक घटना हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यात घडलीय. मृत पावणारे सर्वजण उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी चारजण कामगार आणि एक कंत्राटदार होता. मिळालेल्या माहितीनुसार या सर्वांचा मृत्यू श्वास गुदमरून झाला असावा, असं म्हटलं जाईल. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Five Killed in Kurukshetra Hotel Room:
Crime: मुलीला शेतात खेचत नेलं, तिघांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

कुरुक्षेत्र पोलीस स्टेशनचे अधिकारी दिनेश राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी होते. ते जिल्हा कारागृहाजवळील एका हॉटेलमध्ये रंगकाम करण्यासाठी कुरुक्षेत्रात आले होते. दरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचं समजलं. हॉटेलच्या रुमचा दरवाजा उशिरापर्यंत उघडला नव्हता.

रुममधून कोणीच बाहेर आले नाही. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोकून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु आतून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल व्यवस्थापक आणि पोलिसांना कळवण्यात आले. हॉटेलच्या रुमचा दरवाजा तोडून उघडल्यानंतर पाचही जण बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Five Killed in Kurukshetra Hotel Room:
मॉडेल समुद्राच्या किनार्‍यावर देत होती पोझ, अचानक लाट आली अन्... VIDEO व्हायरल

पोलीस अधिकारी दिनेश राणा यांनी या घटनेबाबत सांगितलं की, बंद खोलीत कोळशाचा चूल सापडली. प्राथमिक अंदाजानुसार विषारी वायू त्यांच्या शरिरात श्वासावाटे गेला असावा, त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून येतंय. मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोस्ट मॉर्टमच्या रिपोर्टनुसार, आधारे पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. रुममध्ये पेटवलेल्या शेकोटीच्या धुरामुळे त्यांचा गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, असावा असा संशय पोलिसांना आहे.

बेळगावमध्येही अशीच घटना घडली होती. तेथे चार ते पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यांनी घरात कोळशाची शेकोटी पेटवली होती. त्यानंतर ते झोपे गेले होते. झोपताना त्यांनी घराच्या दारं खिडक्या बंद केल्या होत्या. त्यातून निघालेल्या धुरामुळे त्यांचा गुदमुरूम मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com