१५४ जणांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली; ६८ जणांचा मृत्यू, ७४ जण बेपत्ता

Yemen Tragedy: येमेनच्या अबयान किनाऱ्याजवळ स्थलांतरितांची भरलेली बोट उलटली. बोटीत १५४ प्रवासी होते, त्यापैकी ६८ मृत, ७४ बेपत्ता.
Yemen Tragedy
Yemen TragedySaam Tv News
Published On
Summary
  • येमेनच्या अबयान किनाऱ्याजवळ स्थलांतरितांची भरलेली बोट उलटली.

  • बोटीत १५४ प्रवासी होते, त्यापैकी ६८ मृत, ७४ बेपत्ता.

  • हे सर्व प्रवासी इथिओपियाचे असून सौदी अरेबियात नोकरीसाठी निघाले होते.

  • केवळ १२ जणांना वाचवण्यात यश.

येमेनच्या अबयान किनाऱ्याजवळ रविवारी मोठी बोट दु्र्घटना घडली. ३ ऑगस्ट रोजी प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली. बोटीत १५४ प्रवासी होते. त्यापैकी किमान ६८ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, इतर ७४ प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीतील सर्व प्रवासी इथिओपियातील रहिवासी होती. जे येमेनमार्गे सौदी अरेबियामध्ये रोजगाराच्या शोधात निघाले होते.

ही दुर्घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. एडेनच्या आखातात ही बोट उलटली. या घटनेनंतर खानफार जिल्ह्यात ५४ मृतदेह किनाऱ्यावर वाहून आल्याची माहिती आहे. तर, १४ मृतदेह जिंजीबार शहरातील रूग्णालयात नेण्यात आले आहे. या अपघातातून १२ जण बचावले असून, त्यामधील ९ इथिओपियन आणि येमेनी नागरिक आहे.

Yemen Tragedy
बाथरूममध्ये आले अन्..., पोलिसांनी नको ते प्रश्न विचारले; पुण्यातील तरूणीचे धक्कादायक आरोप

नेमकं काय घडलं?

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, येमेनच्या अबयान किनाऱ्याजवळ १५४ स्थलांतरितांनी भरलेली बोट उलटली. यामुळे बोटीतील प्रवासी समुद्रात बुडाले. या अपघातात १५४ पैकी फक्त १२ जणांचे प्राण वाचले आहेत. यातील ९ इथिओपियन आणि एका येमेनी नागरिकाचा समावेश आहे. दरम्यान, आतंरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेनं या घटनेचं वर्णन, अलिकडच्या काळातील सर्वात वाईट दुर्घटनांपैकी एक म्हणून केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडल्यानंतर मोठी शोधमोहिम राबवण्यात आली. किनारपट्टीवर विविध भागांमध्ये मृतदेह विखुरलेले आढळले. दरम्यान, बचाव पथकाला शोधमोहिमेत अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासन आणि बचावपथकाकडून शोधमोहिम सुरू आहे.

Yemen Tragedy
मोदींच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार? महाराष्ट्रातील नेत्याचं नाव आघाडीवर, केंद्रात धक्कादायक घडमोडींची शक्यता

आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या आकडेवारीनुसार, २०२३ साली या मार्गावर ५५८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. गेल्या १० वर्षात २,०८२ हून अधिक स्थलांतरित बेपत्ता झाले होते. दरम्यान, भीषण वास्तव म्हणजे, स्थलांतरितांना केवळ समुद्राच्या लाटांना तोंड द्यावे लागत नसून, येमेनमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना तुरूंगवास, छळ आणि समुद्राच्या लाटांना तोंड द्यावे लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com