Video viral : चहाची तलफ पडली महागात; चहासाठी पोलीस गाडी थांबवताच कैद्यांनी ठोकली धूम

Video viral : झाँसीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात येणाऱ्या ३ कैद्यांनी संधी साधत पोलिसांना तुरी दिलीय.
prisoners Escape
prisoners EscapeSaam Tv

Jhansi video Prisoners Escape :

झाँसीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात येणाऱ्या ३ कैद्यांनी संधी साधत पोलिसांना तुरी दिली. झाँसीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात येणाऱ्या ३ कैद्यांनी संधी साधत पोलिसांना तुरी दिली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. (Latest News)

पोलिसांच्या वाहनातून पळ काढलेले कैदी अजून पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दरम्यान सरकारी नोकरीत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी ३ उपनिरीक्षकांसह ८ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. त्यांच्याविरोधात चौकशी देखील करण्यात येत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, आरोपी पोलिसांच्या वाहनात बसले होते. पोलिसांचे वाहन रस्त्यावर थांबली होती. वाहनात कोणी पोलीस कर्मचारी नसल्याचं पाहून आरोपींनी तेथून धूम ठोकली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस वाहन न्यायालयाच्या आवारात उभे करण्यात आले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परंतु त्याच व्हॅनमध्ये एकही पोलीस कर्मचारी नव्हता. याचाच फायदा घेत कैद्यांनी वाहनाचा दरवाजा उघडला आणि तेथून पळ काढला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तिघे कैदी पोलीस व्हॅनमधून बाहेर पडतात आणि रस्त्यावर पळत असल्याचं दिसत आहे. वृत्तानुसार, घटना घडली तेव्हा व्हॅनमध्ये सुमारे ७ आरोपी होते. मात्र, सातपैकी ३ कैदी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाले.

ही घटना मंगळवारी (१९ सप्टेंबर) दुपारी १.४० च्या सुमारास घडली. दरम्यान ११ पोलीस कर्मचारी ७ कैद्यांना झाँशी येथील रेल्वे न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात होते, त्याचवेळी ही घटना घडली.

पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेले आरोपी रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरीच्या आरोपावरून तुरुंगात होते. ब्रिजेंद्र ( २७) शैलेंद्र (२०) आणि ज्ञानप्रसाद (२३) अशी कैद्यांची नावे आहेत. या सर्वांना रेल्वे स्थानकांवरील मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्याप्रकरणी तुरुंगात टाकण्यात आले होते. दरम्यान पसार झालेले कैदी अद्याप फरार आहेत. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितलंय.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. सरकारी निष्काळजीपणा केल्याप्रकरणी ३ उपनिरीक्षकांसह ८ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीही स्थापन करण्यात आली असून फरार आरोपींना पकडण्यासाठी आणखी दोन पथके तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

prisoners Escape
Ganesh Festival 2023 : डाॅक्टरांची तक्रार, गणेशाेत्सव मंडळाच्या 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा; शहर पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com