शाळेतील तीन मैत्रिणींनी एकाच वेळी केलं विष प्राशन; दोघींचा मृत्यू, एकीवर उपचार सुरु

मुलींकडून कोणतीही सुसाईड नोट सापडली नसून तिसऱ्या मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.
 Amravati Poisoning Case
Amravati Poisoning CaseSaam Tv
Published On

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिहोर जिल्ह्यात एकाच शाळेतील 3 मुलींना विष प्राशन करुन झाल्याची घटना समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, सिहोर जिल्ह्यातील शाळेत शिकणाऱ्या 3 विद्यार्थिनींनी इंदूरमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे विष प्राशन केले. पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला, तर त्यांच्या एकीची प्रकृती चिंताजनक आहे. मुलींकडून कोणतीही सुसाईड नोट सापडली नसून तिसऱ्या मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी घडलेल्या या घटनेत सिहोरच्या आष्टा शहरातील ३ मुली इंदूरला पोहोचल्या होत्या. या मुली आपला क्लास बंक करून बसने प्रवास करून इंदूरला आल्या होत्या. एक मुलगी तिच्या प्रियकराने फोन उचलणे बंद केल्यानंतर त्याला भेटायला आली होती. इंदूरला पोहोचल्यानंतर एका मुलीने तिच्या प्रियकराला बोलावले आणि भंवरकुआन भागातील एका उद्यानात त्याची वाट पाहू लागली. पोलिसांनी सांगितले की, तिन्ही मुली वाट पाहत राहिल्या पण कुणीही तिथे पोहोचलं नाही. (Latest News)

 Amravati Poisoning Case
Bharat Jodo Yatra: भारताचे तुकडे होऊ देणार नाही; भारत जोडो यात्रेत राहुल गांधी लहानग्यांसोबत मनसोक्त धावले, पाहा Video

यामुळे एका मुलीचे मुलीने निराश होऊन सोबत आणलेले विष खाल्ल्याचे बोलले जात आहे. तिच्या मैत्रिणीने विष प्राशन केल्यानंतर लगेचच दुसऱ्या मुलीनेही कौटुंबिक समस्या सांगून विष प्राशन केले. दोन मैत्रिणींची अवस्था पाहून तिसर्‍या मुलीनेही विष प्राशन केले, कारण ती त्या दोघीच्या अगदी जवळ होती. मात्र, तिसरी मुलगी वाचली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 Amravati Poisoning Case
दिल्लीतील हवेचं प्रदूषण घातक पातळीवर, सर्व बांधकाम थांबवण्याचे आदेश, काय आहे कारण?

उद्यानातील तीन मुलींची अवस्था पाहून लोकांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले. तेथून मुलींना एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान दोन मुलींचा मृत्यू झाला. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नसून रुग्णालयात दाखल तरुणीच्या जबाबाच्या आधारे तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच मुलींचे पालक इंदूरला पोहोचले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com