Rajya Sabha Election: तुरुंगात असलेले संजय सिंह पुन्हा झाले खासदार, 'आप'ने 3 जागा बिनविरोध जिंकल्या

Delhi Rajya Sabha Election 2024: आपचे तीन राज्यसभेचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. तुरुंगात असलेले संजय सिंह सलग दुसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत.
Rajya Sabha Election 2024
Rajya Sabha Election 2024Saam Tv
Published On

Delhi Rajya Sabha Election:

आम आदमी पक्षाचे (आप) तीन राज्यसभेचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. कथित दारू घोटाळ्यात तुरुंगात असलेले संजय सिंह सलग दुसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल या पहिल्यांदा वरिष्ठ सभागृहाच्या सदस्य झाल्या आहेत. आम आदमी पक्षाने एनडी तिवारी यांनाही दुसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवले आहे.

दिल्लीत राज्यसभेची निवडणूक १९ जानेवारीला प्रस्तावित होती. मात्र तिन्ही जागांसाठी एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने निकाल आधीच जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आम आदमी पक्षाच्या तीनही उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajya Sabha Election 2024
PM Modi Nashik Visit: प्राचीन काळाराम मंदिरात PM मोदींनी केली साफसफाई, पाहा व्हिडिओ

निवडणूक निर्णय अधिकारी आशिष कुंद्रा यांनी सांगितले की, तिन्ही उमेदवारांमध्ये कोणतीही स्पर्धा नसल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. तिघांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. तुरुंगात असलेले संजय सिंहही त्यांचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आले होते. त्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली होती. याआधी त्यांना नामांकनासाठी तुरुंगातून बाहेर येण्याची परवानगीही न्यायालयाने दिली होती.  (Latest Marathi News)

Rajya Sabha Election 2024
QLED 8K Projector: घरातच मिळणार सिनेमागृहाचा आनंद! सॅमसंगने लॉन्च केला पहिला वायरलेस 8K प्रोजेक्टर

बिनविरोध निवड कशी झाली?

दरम्यान, दिल्ली विधानसभेतील एकूण ७० आमदारांपैकी ६२ आम आदमी पक्षाचे आमदार आहेत. भाजपकडे फक्त 8 जागा आहेत. तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी आम आदमी पक्षाकडे पुरेसे संख्याबळ होते. यामुळे भाजपने कोणालाही उमेदवारी दिली नव्हती. आम आदमी पक्षाच्या तिन्ही उमेदवारांनी ८ जानेवारीला अर्ज दाखल केले होते. त्यांच्याशिवाय अन्य कोणीही या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com