Chatgpt Googles New Ai Tool Gemini
Chatgpt Googles New Ai Tool GeminiSaam Tv

Gemini Ai: हे आहे भविष्य! मानवाच्या बुद्धीपुढे धावणारे AI मॉडेल Gemini लॉन्च, ChatGPT ला देणार टक्कर

New Ai Tool Gemini: टेक कंपनी गुगलने नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) मॉडेल जेमिनी (Gemini) लॉन्च केले आहे. हे आतापर्यंतचे सर्वात पॉवरफुल एआय टूल असल्याचे सांगितले जाते, जे ChatGPT शी स्पर्धा करेल.
Published on

Chatgpt Googles New Ai Tool Gemini:

टेक कंपनी गुगलने नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) मॉडेल जेमिनी (Gemini) लॉन्च केले आहे. हे आतापर्यंतचे सर्वात पॉवरफुल एआय टूल असल्याचे सांगितले जाते, जे ChatGPT शी स्पर्धा करेल. कंपनीने म्हटले आहे की, हे त्यांचे सर्वात प्रगत AI मॉडेल आहे आणि ते सर्वात सक्षम देखील आहे. गुगलने याला एका नव्या युगाची सुरुवात म्हटले आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी स्वत: X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.

आता प्रश्न असा आहे की Google चे नवीन AI मॉडेल ChatGPT ला टक्कर देऊ शकेल का? हे ChatGPT प्रतिस्पर्धी मानले जात आहे. Google चा दावा आहे की, जेमिनी हे पहिले एआय मॉडेल आहे जे समस्या सोडवणे, गणित, भौतिकशास्त्र, इतिहास, कायदा, वैद्यकशास्त्र आणि नीतिशास्त्राशी संबंधित काही बेंचमार्कमध्ये मानवी तज्ञांना मागे टाकते. तसेच तज्ञ म्हणतात की, या मॉडेलने ChatGPT थोडे मागे टाकले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chatgpt Googles New Ai Tool Gemini
Tata Pickup Vehicles: Tata Motors ने लॉन्च केले 3 नवीन दमदार Pickup, कमी किंमतीत मिळणार जबरदस्त पॉवर

करू शकतो अनेक काम

गुगलचे हे नवीन मॉडेल खूपच स्मार्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातून अनेक प्रकारची कामे सहज करता येतात. याच्या सामोरे चॅटजीपीटीही फेल झाल्याचे बोलले जात आहे. गुगलचे हे नवीन टूल ओपन एआयच्या चॅटजीपीटी प्रमाणे एआय चॅटबॉट आहे. (Latest Marathi News)

फर्स्टपोस्टच्या अहवालानुसार, Google DeepMind चे CEO डेमिस हसाबिस म्हणाले, “एआयच्या उत्क्रांतीमधील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि आमच्यासाठी एका नवीन युगाची सुरुवात आहे.''

Chatgpt Googles New Ai Tool Gemini
Honda XL750 Transalp: फक्त 3 सेकंदात गाठते 100 किमीचा वेग; ही आहे होंडाची हाय पॉवर बाईक XL750, जाणून घ्या किंमत

काय म्हणाले गुगलचे सीईओ?

पिचाई म्हणाले की, आम्ही जेमिनी 1.0 सादर करत आहोत, ''हे आमचे आजपर्यंतचे सर्वात सक्षम AI मॉडेल आहे. जे मूलतः मल्टीमॉडेल म्हणून तयार केलेले, हे आमच्या जेमिनी युगातील मॉडेल्समधील पहिले पाऊल आहे. जेमिनी तीन आकारांमध्ये सानुकूलित केले आहे - अल्ट्रा, प्रो आणि नॅनो.''

पिचाई पुढे म्हणाले की, जेमिनी अल्ट्राची 32 पैकी 30 मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या शैक्षणिक बेंचमार्कवरील कामगिरी सध्याच्या अत्याधुनिक निकालांपेक्षा चांगली आहे. 90.0 टक्के गुणांसह जेमिनी अल्ट्रा हे MMLU वर मानवी तज्ञांना मागे टाकणारे पहिले मॉडेल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com