Viral Video: क्या गुंडा बनेगा रे तू! गाडी चोरीला आले अन् त्यांचीही ठेवून पळाले, चोरांची झाली फजिती; VIDEO तुफान VIRAL

Thief Trying Steal Scooty Viral Video: नेटकऱ्यांनी "शिकारी खुद शिकार हो गया," अशा मजेशीर प्रतिक्रिया यावर दिल्या आहेत.
Viral Video
Viral VideoSaamtv

Scooty Steal Viral Video: चोरी करण्यासाठी चोर नेहमी वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. ज्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. अनेकदा चोरीचा प्रयत्न त्यांच्यावरच उलटल्याचेही पाहायला मिळते, ज्यामुळे चोरांची चांगलीच फजितीही होते. सध्या अशाच एका जबरदस्त चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चोरांचीच फजिती झाल्याने धुम ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओची कथा, चला जाणून घेवू... (Latest Marathi News)

Viral Video
HC On Aurangabad Name Change: औरंगाबादचे नाव सरकार दरबारी बदलू नका; मुंबई हायकोर्टाचे महत्वाचे निर्देश

सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडिओ (Viral Video) पाहायला मिळतात. जे पाहून कधी भितीने गाळण उडते, तर कधी आश्चर्याचा धक्काही बसतो. सध्या अशाच एका चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चोरांच्या गाडी चोरीचा प्रयत्न त्यांच्यावरच उलटल्याचे पाहायला मिळत आहे..

शेवटी चोरांची अशी फजिती होते की, त्यांना त्यांची गाडीही ठेवून धुम ठोकावी लागल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. चोरांच्या फसलेल्या चोरीच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांचे मात्र चांगलेच मनोरंजन केले आहे.

Viral Video
Kalyan Shivsena News: कल्याणमध्ये ठाकरे गटाला खिंडार! अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या गळाला...

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये; चोर घराबाहेर पार्क केलेली स्कूटी चोरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ते दोघेही एका स्कूटीवर बसून येतात. त्यानंतर एक चोर आपल्या स्कूटीवर आणि दुसरा चोरीच्या स्कूटीवर बसून गाडी गेटबाहेर काढण्यास सुरूवात करतात. गाडी गेटबाहेर घेवून पळ काढणार इतक्यात लोक त्यांना पाहतात आणि आरडाओरडा करतात.

त्यानंतर सर्व बाजूंनी माणसं धावत आली आणि चोरट्यांची चांगलीच पंचाईत झाली. त्याचवेळी चोरांचीही स्कूटी खाली पडली. मात्र लोक पळत आल्याने त्यांना ती उचलण्याचीही संधी मिळाली नाही. शेवटी त्यांना त्यांची गाडीही ठेवून पळ काढावा लागल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, @Ambrish89 ट्विटर (Twitter) अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी "शिकारी खुद शिकार हो गया," अशा मजेशीर प्रतिक्रिया यावर दिल्या आहेत. तसेच यावर अनेकांनी क्या गुंडा बनेगा रे तू म्हणत, चोरांची टिंगलही केल्याचे पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com