केरळमध्ये कोरोनाची तिसरी लाट? २४ तासांत २३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण

देशात कोरोना प्रादुर्भाव पुन्हा एकदा वर डोके काढत आहे.
केरळमध्ये कोरोनाची तिसरी लाट? २४ तासांत २३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण
केरळमध्ये कोरोनाची तिसरी लाट? २४ तासांत २३ हजारांपेक्षा जास्त रुग्णSaam Tv
Published On

केरळ : देशात कोरोना Corona प्रादुर्भाव पुन्हा एकदा वर डोके काढत आहे. स्थिर असलेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत चाली आहे. केरळ Kerala राज्यामध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचे बघायला मिळत आहे. गेल्या २ महिन्यात एखाद्या राज्यात २४ तासांमध्ये वाढलेल्या रुग्णसंख्यापैकी सर्वाधिक रुग्णसंख्या ही केरळमध्ये आहे.

गेल्या २४ तासांत केरळमध्ये २३ हजार ६०० कोरोना रुग्ण सापडले आहे. देशाच्या रुग्णसंख्येपैकी फक्त केरळमध्ये ५० टक्केंपेक्षा जास्त रुग्ण आहेत. केरळ मध्ये वाढलेल्या रुग्णसंख्येने देशामधील रुग्णसंख्या पुन्हा एकदा ४० हजारांपेक्षा जास्त झालेली आहे. केरळशिवाय दिल्ली Delhi मध्ये देखील कोरोना रुग्णसंख्येत चांगलीच वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे.

हे देखील पहा-

कोरोना रुग्णांच्या ७० टक्के रुग्ण केरळ आणि महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक आहेत. इतर राज्याच्या तुलनेमध्ये गेल्या २ महिन्यात केरळमध्ये सर्वात जास्त आढळलेली रुग्णसंख्या आहे. २७ मे दिवशी तामिळनाडू मध्ये २४ हजार कोरोना रुग्ण आढळले होते. गेल्या २ महिन्यापासून देशामधील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली होती. दुसरी लाट ओसरल्याचे तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केलेला होता.

केरळमध्ये कोरोनाची तिसरी लाट? २४ तासांत २३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण
कोरोनाची तिसरी लाट अटळ; भारतातील तज्ज्ञांची माहिती...

मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. केरळ राज्याने आता देशाची चांगलीच मोठी चिंता वाढवली आहे. देशाच्या ५६ टक्के रुग्ण फक्त केरळमध्ये आढळले आहेत. केरळचा पॉझिटिव्हिटी रेट हा ११.१८ टक्के इतका झालेला आहे. मागील मंगळवारच्या तुलनेमध्ये या मंगळवारी देशाची रुग्णसंख्या थोड्याशा प्रमाणात घटली आहे.मात्र, केरळमधील रुग्णसंख्या वाढली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com