नवी दिल्ली : देशात कोरोना Corona व्हायरसची virus प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबद्दल रोज अनेक शक्यता वर्तवले जात आहे. यादरम्यान सीएसआयआरने CSIR कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल मोठी आणि महत्वाची माहिती दिली आहे.
हे देखील पहा-
कोरोनाची तिसरी लाट येणार आहे हे अटळ आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सीएसआयआरचे महासंचालक तज्ज्ञांनी यावेळी सांगितले आहे. कोरोनाची तिसरी लाट निश्चितपणे येणार आहे. पण कधी येणार आणि त्याची लक्षणे काय राहणार याचा अंदाज लावू शकत नाही. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार भारतातील India तज्ज्ञांनी सांगितलेल्या, ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेन पुढील लाट बघितली आहे.
आपल्याला एक संरक्षित दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे. पुढील लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. पण कशी आणि कधी हे अद्याप माहिती नाही झाली. व्हायरसचा नवा म्युटंटं किंवा कोरोना नियम शिथील केल्याने हे होऊ शकते. लसीकरण आणि मास्कचा वापर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यात मदत करू शकणार आहे.
कोरोना लस पूर्णपणे काम करते आहे. याचे वैज्ञानिक पुरावे असणार आहेत. सध्या तिसऱ्या लाटे विरोधात लशीलाच एकमेव शस्त्र मानले जातं आहे. सर्वांनी लवकरात लवकर लस घ्यावी. जेणेकरून तिसऱ्या लाटेशी सामना करणे सोपे राहणार आहे, असे सल्लाही तज्ज्ञांनी यावेळी दिला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.