China Covid Update : चीनमधील भीषण वास्तव सॅटलाईट फोटोंनी उघडकीस; "मृतांची आकडेवारी लपवली जातेयं", WHO चा आरोप

या ठिकाणचे वास्तव समोर आणणारे काही सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत.
China Covid Update
China Covid UpdateCNN
Published On

China Covid Update : चीनमध्ये सध्या कोरना महामारीने मोठे थैमान घातले आहे. मात्र चीन सरकारकडून आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप जागतिक आरोग्य संघटनेकडून होत आहे. चीनमध्ये सध्या सुरूवातीच्या काळात जेव्हा पहिल्यांदा कोरोना महामारी आली होती त्याहूनही अधिक बिकट परिस्थिती आहे. रोज अनेक व्यक्तींचा मृत्यू होत आहे.

मात्र मृतांची आकडेवारी देखील लपवली जात आहे. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे हे समजून घेणे जागतिक आरोग्य संघटनेसमोर मोठे आवाहन आहे. अशात आता या ठिकाणचे वास्तव समोर आणणारे काही सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत. (Latest China Covid Update News)

बुधवारी डब्लूएचओने एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात ११ हजार ५०० मृतांची नोंद झाली. यात ३० टक्के युरोप, ४० टक्के अमेरिका आणि ३० टक्के रुग्ण पश्चिम पॅसिफिकचे असल्याचे जागतीक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. यात चीनने कोरोना रुग्णांची संख्या स्पष्ट केली नसल्याचे देखील त्यांनी नमुद केले आहे.

China Covid Update
China Covid updates : राष्ट्रपती जिनपिंग यांनी सोडलं चीनच्या कोरोना उद्रेकावर मौन; म्हणाले,'लोकांचे प्राण...'

"कोरोना महामारीचा XBB.1.5 हा नवा व्हेरिएंट आला आहे. याला रोखण्यासाठी किक्वेन्सिंग फार महत्वाचे आहे. आम्ही सर्व देशांना त्यांची आकडेवारी सादर करण्यास सांगितले आहे. मात्र चीनमधील आकडेवारी लपवली जात आहे.", असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले आहे.

China Covid Update
China Covid : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा कहर; नवीन रुग्णांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ

एका हिंदी वृत्त वाहिनीने दिलेल्या अहवालानुसार, आतापर्यंत ५००० व्यक्ती कोरोनाने दगावल्यात असे चीन सरकारने म्हटले आहे. मात्र वास्तवात दिवसाला हजारो व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत आहे. स्मशान भूमीमध्ये मृत देह जाळण्यासाठी जागा मिळत नाही अशी स्थिती असल्याचे यात म्हटले आहे. तसेच चीनच्या सर्व परिस्थितीचे सॅटलाईट फोटो देखील समोर आणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com