Taliban government: तालिबानने विद्यार्थ्यांसाठी जारी केले अजब फरमान

अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता आल्यापासून सतत वादग्रस्त आदेश जारी केले जात आहेत.
Taliban government new order
Taliban government new orderSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता आल्यापासून सतत वादग्रस्त आदेश जारी केले जात आहेत. नवीन आदेशानुसार, काबूल विद्यापीठ (University) आणि काबुल पॉलिटेक्निक कॉलेजात (college) मुला- मुलींच्या अभ्यासासाठी सरकारने (government) वेगवेगळे दिवस निश्चित केले आहेत. सरकारच्या या निर्णयाला विद्यापीठातील कर्मचाऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचा विरोध होत आहे.

हे देखील पाहा-

मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठाचे प्राध्यापक महदी आरेफी म्हणाले की, शैक्षणिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप सकारात्मक दिशेने असायला हवा आणि सरकारने नवीन सुविधांसह नवीन संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. पण इथे सरकारचा अनावश्यक हस्तक्षेप आहे. एका विद्यार्थ्याने (student) दिलेल्या माहितीनुसार की, सध्या आम्ही एका दिवसात ३ विषयांचा अभ्यास करतो. मात्र, नवीन वेळापत्रकानुसार एका दिवसात ६ विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. यासाठी आम्हाला अधिक वेळ आणि श्रम द्यावे लागणार आहे, जे विद्यार्थ्यांच्या क्षमतेबाहेरचे आहे. सरकारच्या या निर्णयाचा सोशल मीडियावर (Social media) देखील मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. नव्या वटहुकुमामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

Taliban government new order
लाऊडस्पीकर संबंधीची सर्वपक्षीय बैठक संपली; केंद्राने निर्णय घेतला तर राज्यातही होणार लागू

विद्यार्थी तीन दिवस विद्यापीठात जाणार

मिळालेल्या माहितीनुसार, उच्च शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन वेळापत्रकाच्या आधारे, मुलींना आठवड्यातील ३ दिवस विद्यापीठात जावे लागणार आहे, तर उर्वरित ३ दिवस मुलांना जावे लागणार आहे. हे वेळापत्रक सध्या २ विद्यापीठांसाठी तयार करण्यात आले असून ते मे महिन्यात लागू होणार आहे.

यापूर्वी, तालिबानने मुला- मुलींना विद्यापीठात शिकण्यास बंदी घातली होती आणि मुलींना सकाळच्या वर्गात बसण्याची परवानगी होती, तर मुलांना संध्याकाळी परवानगी होती. संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये मुलींसाठी माध्यमिक शाळा पुन्हा सुरू होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com