इथे नवरी न मिळे नवऱ्याला! 'सल्लू' गावाबद्दल ऐकलं का?

हे नाव अभिनेता म्हणून सलमानच्या नावावरून ठेवण्याचे कारण म्हणजे तर हे कारण या गावामध्ये अविवाहित तरुणांची संख्या गेल्या दहा वर्षांपासून वाढतच जात आहे.
इथे नवरी न मिळे नवऱ्याला! 'सल्लू' गावाबद्दल ऐकलं का?
इथे नवरी न मिळे नवऱ्याला! 'सल्लू' गावाबद्दल ऐकलं का?Saam Tv
Published On

गडाग: गडाग शहरापासून सुमारे 59 किमी दूर गडागोली या छोट्याशा खेड्यातील लोकांनी या गावाचं नामकरण सलमान खानच्या Salman Khan  नावावरुन केलं आहे. हे नाव अभिनेता म्हणून सलमानच्या नावावरून ठेवण्याचे कारण म्हणजे तर हे कारण या गावामध्ये अविवाहित तरुणांची संख्या गेल्या दहा वर्षांपासून वाढतच जात आहे.

या मुलांमधील बहुतेकजण हे शेतकरी Farmers आहेत. आता ते माजी मंत्री सी सी पाटील आणि स्थानिक आमदारांना आपल्याला मुलगी शोधून देण्यासाठी विनंती करत आहेत. मुलीकडचे लोक या पूरग्रस्त गावात आपल्या मुली देण्यास टाळत आहेत. त्यामुळे बहुतेकांना लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्याची स्थिती इथे आहे.

हे देखील पहा-

मागील काही वर्षांमध्ये यांच्यासाठी नवीन गावात 500 घरं बांधण्यात आली होती. मात्र, अजूनही ती राहण्यासाठी पूरग्रस्तांना देण्यात आलेली नाही आहेत. गावातील मुलांच्या लग्नाचे प्रस्तावही नाकारले जात आहेत आणि याचे  कारण म्हणजे त्यांच्याकडे चांगली घरं नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या घरांमध्ये ते लोक सध्या राहतात, त्याला खिडक्या आणि दरवाजे सुद्धा नाहीत. गावातील शेतकऱ्यांकडे जमिनी आहेत परंतु सततचा दुष्काळ आणि महापूर यामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

इथे नवरी न मिळे नवऱ्याला! 'सल्लू' गावाबद्दल ऐकलं का?
विदर्भातील वाघांची सह्याद्रित डरकाळी !

इथल्या युवकांना गावाच्या या अवस्थेमुळे  लग्नासाठी नवरीच मिळत नसल्याची स्थिती आहे. या गावात ३० ते ४० या वयोगटातील तब्बल १२० युवकच अद्याप अविवाहित आहेत. या गावातील एका युवकाने म्हटलं की, आजही आम्ही राहाण्यासाठी घरे मिळतील याची वाट पाहत आहोत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com