
नवी दिल्ली - भारतात नवीन संविधान तयार करण्याची गरज असून आता ते नव्याने लिहिण्याची गरज असल्याच वक्तव्य तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर राव (Chandrasekhar Rao) यांनी केलं आहे. तसंच मी सर्व नेत्यांना भेटून माझी मतं त्यांना सांगणार आहे. त्यांनी माझ्यासोबत लढावं असही त्यांना सांगणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. क्रांतीकारी विचारांना पुढे नेत युवकांनी आपल्या गरजांसाठी लढण्याची गरज आहे. देशात गुणात्मक बदल अपेक्षित आहेत असही ते म्हणाले
राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर आता भाजपविरुद्ध देशभरातील विरोधक एकटवत आहेत. इतर राज्यांनीही मोदी सरकारविरुद्ध मोट बांधायला सुरुवात केली आहे. तसाच प्रयोग करण्यासाठी चंद्रशेखर राव हे देखील सर्व पक्षातील नेत्यांची भेट घेणार आहेत.
ते म्हणाले 'पंतप्रधान मोदी हे दूरदर्शी नेते नाहीत तसंच मोदी सरकार केंद्रातून बाजूला काढून त्याला बंगालच्या खाडीत फेकून द्यायला पाहिजे आणि त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. देशाचं नेतृत्व बदलायला हवं. देशाला असमजूतदार पक्षाच्या नेत्यांपासून मुक्त करायला पाहिजे असं सांगतच मी लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) भेटण्यासाठी मुंबईला जाणार असल्याचही ते यावेळी म्हणाले आहेत. तसंच भाजप सोशल मीडियाचा (Social Media) गैरवापर करत समाजात फूट पाडण्याचं आणि खोटा प्रचार करण्याचं कामही करत असल्याचे चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.