
रश्मी पुराणिक -
मुंबई : आज मुंबईत काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्त्वात यूथ काँग्रेसकडून पेगाससच्या मुद्यावरुन भाजपच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येत होते. मात्र पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा अडवडला, कारण याच वेळी भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) आक्रमक होत त्यांनी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसह ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दिशेनं निघाले होते मात्र पोलिसांनी भाजपचा मोर्चाही अडवला.
मुंबईत भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस (Congress) विरोधात आक्रमक झाले असून भाजपवर (BJP) कुणी गुंडशाहीनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं पद्धतीनं उत्तर देऊ असा इशारा भाजपकडून देण्यात आला होता. दरम्यान याच सर्व दोन्हीकडील कार्यकर्त्यांच्या धरपकडीवरती राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी वक्तव्य केलं आहे.
नेत्यांच्या घरी आंदोलन करणे अयोग्य -
ते म्हणाले, 'राजकीय पक्षांनी आंदोलनात काही मर्यादा पाळल्या पाहिजेत एखाद्या राजकीय पक्षाने दुसरऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यालयावर, नेत्यांच्या घरी आंदोलन करणे योग्य नाही तसेच दुसर्या राजकीय पक्षाच्या आंदोलनात घुसणेही योग्य नसल्याचं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसंच अशा कृत्यांमळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक पक्षाने याबाबत आचारसंहिता लागू केली पाहिजे असही ते यावेळी म्हणाले.
सगळ्यात जास्त दारू पिणारे भाजपचे नेते -
दरम्यान त्यांनी राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावरती भाजपने केलेल्या टीकेला मलिक यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले भाजपचे नेते विखे पाटील यांचा दारूचा रॉकेट ब्रॅण्ड आहे. तसंच भाजपचे नेते हे बंद करणार आहेत का? भाजपच्या नेत्यांची वाईनची दुकाने आहेत ती बंद करणार आहेत का? असा सवाल उपस्थित करतच दारू पिणारे सगळ्यात जास्त भाजपचे नेते आहेत. भाजपचे खासदार सांगतात थोडी थोडी पिया करो असही ते यावेळी म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.