राजस्थान : मुलीने परीक्षेत कॉपी केली म्हणून वडिल वर्ग मैत्रिंणीसमोर ओरडले आणि मैत्रीणीसमोर वडिल रागवल्याने अपमानित झालेल्या मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राजस्थानच्या उदयपूरमधील बिछीवाडा येथे सिनीअर स्कूलमध्ये (School) इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या या मुलीने 22 फेब्रुवारी 2022 रोजी हिंदीच्या पेपरला कॉपी केली आणि ती शिक्षकांच्या निदर्शनास आली. दरम्यान या मुलीचे वडिल त्याच शाळेत ग्रंथालयात कामाला असल्याने त्यांनी तिला लगेच तिच्या वर्गात सर्वांसमोर जाऊन झापलं.
मात्र मैत्रिणींसमोर झालेला अपमान सहन न झाल्यानं निराश झालेल्या या 13 वर्षाच्या मुलीनं घरी येऊन विष पिलं. तिने विष पिल्याचं लक्षात येताच तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान तिचा मृतदेह पोलिसांनी शविविच्छेदनासाठी पाठवला आहे.
Edited By -Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.