floods and landslides in the central and southern Philippines.
floods and landslides in the central and southern Philippines. saam tv

Philippines: भूस्खलन, पुरामुळे ४३ ठार; लष्कराचे बचाव कार्य वेगाने सुरु

या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे.

मनिला : मध्य आणि दक्षिण फिलीपिन्समध्ये (southern philippines) पूर (flood) आणि भूस्खलनामुळे (landslide) झालेल्या विध्वंसातील मृतांची संख्या ४३ पेक्षा अधिक झाली आहे. अद्याप २८ नागरिक बेपत्ता असल्याचे सांगितलं जात आहे. (philippines latest marathi news)

सोमवारी पहाटे मध्य लेयते प्रांतातील बेबे (bebe) शहरात झालेल्या भूस्खलनात १०० हून अधिक ग्रामस्थ जखमी झाले. तसेच या घटनेत बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर, पोलीस आणि इतर बचाव कर्मचारी ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री दिली.

rescue operation in philippines.
rescue operation in philippines. saam tv

शोध आणि बचाव मोहिमेवर (resuce operation) देखरेख करणारे लष्कराचे ब्रिगेड कमांडर कर्नल नील वेस्टुइर (Colonel Neil Westuer) म्हणाले या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. त्यामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. सध्या ३६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

floods and landslides in the central and southern Philippines.
Nanded: परभणीत रचला गेला संजय बियाणींच्या खूनाचा कट? पत्रानं उडाली खळबळ

मध्य समर आणि निग्रोस ओरिएंटल आणि दक्षिणेकडील दावो डी ओरो आणि दावो ओरिएंटल प्रांतांमध्ये इतर सात जण पुराच्या पाण्यात बुडाले. विशेष म्हणजे, दरवर्षी जूनच्या आसपास फिलीपिन्समध्ये किमान २० चक्रीवादळे येतात. ज्वालामुखीचा उद्रेक आणि भूकंप या आपत्ती-प्रवण आग्नेय आशियाई देशातही होतात.

Edited By : Siddharth Latkar

landslide in philippines.
landslide in philippines. saam tv
floods and landslides in the central and southern Philippines.
'पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे भाजप असल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देईन'
rescue operation in philippines by army.
rescue operation in philippines by army.saam tv

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com