CCTV : घरमालक अमेरीकेत, घरावर पडला दरोडा; मात्र सीसीटीव्ही आला कामाला

शामनगर भागातील एका घरामध्ये चोर घुसले होते मात्र ते ज्या घरात चोरी करण्यासाठी गेले होते त्या घरामध्ये CCTV लावले होते त्यामुळे अमेरिकेत असणाऱ्या घरमालकाला चोर घरात घुसल्याचं समजलं.
CCTV : घरमालक अमेरीकेत, घरावर पडला दरोडा; मात्र सीसीटीव्ही आला कामाला
CCTV : घरमालक अमेरीकेत, घरावर पडला दरोडा; मात्र सीसीटीव्ही आला कामालाSaam TV

मुंबई : आजकाल घरात कोणी नसताना घरामध्ये दरोडा टाकण्याच्या घटना वाढल्या आहेत. आणि त्यामुळे आपण जर परगावी जाताना घराची काळजी आपणाला लागून राहते. मात्र एका घरमालकाला मात्र त्याने लावलेल्या CCTV मुळे घरामधील चोरी करणाऱ्या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

सोमवारी कानपूरच्या शामनगर भागातील एका घरामध्ये चोर घुसले होते मात्र ते ज्या घरात चोरी करण्यासाठी गेले होते त्या घरामध्ये CCTV लावले होते त्यामुळे अमेरिकेत (America) असणाऱ्या घरमालकाला चोर घरात घुसल्याचं समजलं.

CCTV : घरमालक अमेरीकेत, घरावर पडला दरोडा; मात्र सीसीटीव्ही आला कामाला
ही कसली दुश्मनी? 35 एकरातील तुरीला अज्ञातांकडून आग; लाखो रुपयांचे नुकसान

घरमालकाने तात्काळ पोलिसांना फोन करत आपल्या घरात चोर घुसल्याचं सांगितलं. पोलिसांनी देखील माहिती मिळताच त्या घराला घेरा घातला आणि चोरांना शरण येण्यास सांगितलं. मात्र पोलीसांना घाबरलेल्या चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केला असता पोलिसांनीही त्या चोरट्यांवरती गोळीबार या गोळीबारात एका चोराच्या पायाला गोळी लागली आहे.

हे देखील पहा -

विजय अवस्थी या व्यक्तीचं कानपूरमध्ये (Kanpur) घर आहे. सोमवारी मध्यरात्री त्यांच्या घरात चोर शिरले होते. त्यावेळी अमेरिकेत सकाळ असल्याने अवस्थी हे मोबाईल फोन पाहत असल्य़ाने त्यांना त्यांच्या घरामध्ये कोणीतरी घुसल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांनी लगेच कानपूर पोलिसांना फोन लावला आणि आपल्या घरात चोर घुसल्याचं सांगितलं. आणि पोलिसांना त्या चोरांना पकडलं.अवस्थी यांनी लावलेल्या CCTV मुळे त्यांच लाखो रुपयांच नुकसान टळलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com