ही कसली दुश्मनी? 35 एकरातील तुरीला अज्ञातांकडून आग; लाखो रुपयांचे नुकसान

तुरीची गंजी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार महागाव मधील तुळशीनगर भागात घडला.
Yavatmal: ही कसली दुश्मनी? 35 एकरातील तुरीला अज्ञातांकडून आग; लाखो रुपयांचे नुकसान
Yavatmal: ही कसली दुश्मनी? 35 एकरातील तुरीला अज्ञातांकडून आग; लाखो रुपयांचे नुकसानSaam Tv

यवतमाळ: निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी मेटाकूटीला आला आहे. वर्षभराची मेहनत आणि पिकावर केला खर्च अवकाळीने पाण्यामध्ये गेला आहे, असे असताना अथक परिश्रम आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या तुरीची काढणी करत आता उद्या मळणी करताच काही (unidentified thieve) अज्ञातांनी तुरीच्या गंजीचे पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार (Yavatmal) महागाव मधील तुळशीनगर भागात घडला आहे. ३५ एकरात तुरीची कापणी करुन संजय जानुसिंग राठोड यांनी साठवणूक केली होती. या ३५ एकरात जवळपास ८० क्विंटल तुरीचे उत्पादन शेतकऱ्यास (farmer) अपेक्षित होते. पण अज्ञातांनी केलेल्या प्रकाराने राठोड यांनी (Toor Crop) तुरीच्या गंजीच्या ठिकाणी तुरीची राखच बघ्याची नामुष्की ओढावली होती. एकीकडे नैसर्गिक संकटाचा सामना करत शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.

हे देखील पहा-

दुसरीकडे अशा धक्कदायक घटना समोर येत आहेत. बुधवारी सकाळी गंजीची अवस्था बघून जो- तो एकच म्हणत होता ही कसली ही दुश्मनी? एकतर अवकाळी पावसाने तुरीची कापणी लांबणीवर पडली होती. प्रतिकूल परस्थितीत संजय राठोड यांनी मजूर लावून ३५ एकरात तुराची कापणी करण्यात आली. शिवाय यंत्राच्या सहायाने मळणी करण्याच्या हिशोबाने गंजही लावण्यात आली. मात्र, मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांनी या गंजीला आग (Crop) लावली आहे. सध्याच्या बाजारभावानुसार ३ ते ४ लाखाचे नुकसान झाल्याचा दावा शेतकरी यांनी यावेळी केला आहे. वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे पीक जोपासण्याकरिता अधिकचा खर्च देखील झाला होता. शिवाय तुरीचे भाव वाढत असल्यामुळे राठोड यांना जो खर्च झाला तरी पदरी पडेल अशी आशा होती. पण शेताचे हे चित्र बघून त्यांना मोठा धक्काच बसला आहे.

Yavatmal: ही कसली दुश्मनी? 35 एकरातील तुरीला अज्ञातांकडून आग; लाखो रुपयांचे नुकसान
Pune: स्वर्णव सापडला! पण भेटायला निघालेल्या आत्याचा झाला मृत्यू

अधिकचे क्षेत्र असल्यामुळे मागील ८ दिवसांपासून कापणीचे काम सुरु होते. शिवाय आता पावसाने उघड दिल्याने २ दिवसांमध्ये यंत्राचे सहायाने ते मळणी करणार होते. मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल आणि अवकाळी यामुळे शेतीकामे रखडली होती. आता कुठे वातावरण निवळले होते. एवढे दिवस निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत त्यांनी पिकांची जोपासणा केली पण अज्ञातांनी केलेल्या या घटनेतून राठोड यांचे तुरीचे पीक वाचवू शकले नाही. सदर घडलेली घटना निदर्शनास आल्यावर संजय जानुसिंग राठोड यांनी महागाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या घटनेने हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे. त्यामुळे राठोड यांचे दुहेरी नुकसान झाले, असून पोलीसांनी (police) या घटनेतील आरोपींना जेरबंद करण्याची मागणी यावेळी केली आहे. तर नुकसानभरपाई देण्याची मागणी राठोड यांनी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com