Pune: स्वर्णव सापडला! पण भेटायला निघालेल्या आत्याचा झाला मृत्यू

बाणेर येथील अपहरण झालेल्या मुलगा स्वर्णव चव्हाण सुखरूप घरी पोहचल्याची आनंदाची बातमी मिळाल्यानंतर रात्रीच नांदेडवरून भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला
Pune: स्वर्णव सापडला! पण भेटायला निघालेल्या आत्याचा झाला मृत्यू
Pune: स्वर्णव सापडला! पण भेटायला निघालेल्या आत्याचा झाला मृत्यूSaam Tv
Published On

पुणे: बाणेर (Baner) येथील अपहरण (Abduction) झालेल्या मुलगा स्वर्णव चव्हाण सुखरूप घरी पोहचल्याची आनंदाची बातमी मिळाल्यानंतर रात्रीच नांदेडवरून (Nanded) भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघातात (accident) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुनीता संतोष राठोड चव्हाण (वय- 36) यांचा अपघातामध्ये नगर (Ahmednagar) महामार्गावर चार चाकी अपघातात मृत्यू झाला असून त्यांची दोन मुले व पती गंभीर जखमी झाले आहेत.

हे देखील पहा-

समर राठोड (वय- 14) अमन राठोड (वय- ६) अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोन्ही लहान मुलांना उपचारासाठी पुण्यात (Pune) बाणेर येथील खाजगी रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सुमारे ८ दिवसांंनंतर या चिमुकल्याच्या शोध लागल्याने त्याच्या आई-वडिलांसह पुणे पोलिस आणि पुणेकरांनीही सुटकेचा निश्वास घेतला आहे.

Pune: स्वर्णव सापडला! पण भेटायला निघालेल्या आत्याचा झाला मृत्यू
Mumbai Local Train: लोकलमध्ये चढताना तोल गेल्याने तो खाली कोसळला आणि...(पहा व्हिडिओ)

पुण्यातील (Pune) बालेवाडी (Balewadi) हाय स्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून स्वर्णव चव्हाण (Swarnav Chavan) (दुग्गू) याचं अपहरण (Kidnapped) करण्यात आलं होतं. ही घटना 11 जानेवारी रोजी घडली होती. मुलाच्या वडिलांनी देखील यासंदर्भात सोशल मीडियावर आवाहन केलं होतं. स्वर्णव चव्हाण याचे वडील सतिश चव्हाण यांच्याकडून फेसबुकवर याबाबत पोस्ट करण्यात आली होती. कालच स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद सर्व कुटुंबीय आणि बाणेर परिसरात साजरा केला जात होता. या घटनेमुळे बाणेर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com