Diwali 2022 Celebration in USA: देशभरात दिवाळी उत्साहात साजरी केली जातेय. लॉकडाऊननंतर प्रथमच दिवाळी निर्बंधमुक्त असल्याने देशात दिपावलीचा (Diwali 2022) उत्साह शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेतही (USA) दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन नागरिकांसोबत आपले शासकीय निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. यादरम्यान दोघेही दिवाळी समारंभात उपस्थित भारतीयांमध्ये पोहोचले आणि त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. यादरम्यान नृत्याचेही सादरीकरणही करण्यात आले. (Joe Biden Latest News)
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिवाळीनिमित्त आपल्या भाषणात दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच भारतीय वंशाच्या असलेल्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनीही आपल्या भाषणातून नागरिकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांनी चिमुकल्यांसह दिवाळीही साजरी केली. यावेळी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याच्या स्वागत समारंभात नागरिकांना संबोधित केले. त्या म्हणाल्या, आज रात्री जगभरातील एक अब्जाहून अधिक लोकांसह, आपण दिवा लावू आणि वाईटावर चांगल्याचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करू. (USA Latest News in Marathi)
उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी समारंभाला संबोधित केले. बायडेन म्हणाले की, तुमचे यजमानपद भूषवण्याचा आम्हाला सन्मान वाटतो. व्हाईट हाऊसमध्ये होणारा अशा प्रकारचा हा पहिलाच दिवाळी उत्सव आहे. आपल्याकडे इतिहासात पूर्वीपेक्षा जास्त आशियाई-अमेरिकन आहेत. दिवाळीला अमेरिकन संस्कृतीचा भाग बनवल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत असं म्हणत त्यांनी भारतीयांचे आणि भारतीय वंशाच्या नागरिकांचे आभार मानत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (In celebration of the Festival of Lights, President Biden and the First Lady hosted a Diwali reception at the White House.)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.