Thailand Shooting: भयंकर! थायलंडमध्ये चाईल्ड केअर सेंटरमध्ये गोळीबार, 22 मुलांसह 34 जणांचा मृत्यू

हल्लेखोर आरोपी माजी पोलीस असल्याची माहिती समोर आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Thailand Firing
Thailand Firing Saam Tv
Published On

बँकॉक : थायलंडमध्ये एका चाईल्ड केअर सेंटरमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. या अंदाधुंद गोळीबारात एकूण 34 निष्पाप जीव गेले आहे. मृतांमध्ये 22 मुलांचा समावेश आहे. हल्लेखोर आरोपी माजी पोलीस असल्याची माहिती समोर आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Thailand Firing
माँ, तेरे कदमों में जन्नत है! भर रस्त्यात राहुल गांधींनी सोनिया गांधींच्या बुटाची बांधली लेस

हल्लेखोरांनी मुलांना आणि प्रौढांना आपला निशाणा बनवलं. अनेकांवर त्यांना चाकूनेही हल्ला केला. चाईल्ड केअर सेंटरमध्ये गोळीबार केल्यानंतर हल्लोखोर त्याच्या घरी गेला. तेथे त्याने पत्नी आणि मुलाचीही हत्या केली. त्यानतंर स्व:ताला गोळी मारुन आत्महत्या केल्याची देखील माहिती समोर येत आहे.

Thailand Firing
Greece Boat Accident : ग्रीसमध्ये खडकावर बोट आदळल्याने मोठी दुर्घटना, १७ जणांचा मृत्यू

हल्ल्यामागचा हल्लेखोराचा हेतू अजूनतरी स्पष्ट झालेला नाही. पोलिसांचे प्रवक्ते आचायॉन क्राथोंग यांनी सांगितले की, ही घटना नॉन्ग बुआ लम्फू प्रांतात घडली. किमान 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पन्या खमराब असे आरोपीचं नाव असल्याचं समोर आलं आहे. या आरोपी माजी पोलीस अधिकाऱ्याचे वय 34 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. तो जवळच्याच पोलीस ठाण्यात तैनात होता. काही काळापूर्वी त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com