आता थायलंड आणि कंबोडियामध्ये युध्द, थायलंडचा कंबोडियावर एअरस्ट्राईक

Decade-Old Border Conflict Reignites: 2011 नंतर थायलंड आणि कंबोडियात पुन्हा एकदा युद्ध सुरु झालय. या युद्धाला दोन्ही देशातील जुना वाद कारणीभूत ठरलाय.. हा वाद काय आहे? दोन देशांमध्ये युद्धाला सुरुवात का झाली?
Thailand launches airstrikes on Cambodia near the disputed Preah Vihear temple, reigniting the long-standing border conflict.
Thailand launches airstrikes on Cambodia near the disputed Preah Vihear temple, reigniting the long-standing border conflict.Saam Tv
Published On

रशिया- युक्रेन , इस्रायल - इराण, या देशात पेटलेले संघर्ष पूर्णपणे थांबले नसतानाच आशियातील आणखी दोन देशांमध्ये संघर्ष सुरू झालाय... थायलंडने कंबोडियन लष्करी केंद्रावर हवाई हल्ले केलेत. त्यातच थाई आणि कंबोडियन सैन्यात झालेल्या एका छोट्या चकमकीत एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाल्याने तणाव आणखी वाढलाय.... तसचं कंबोडियन हल्ल्यात थायलंडमध्ये किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या दोन शेजारील देशांमध्ये संघर्ष का निर्माण झालाय

1100 वर्षांपूर्वीच्या शिवमंदिरामुळे दोन्ही देशात संघर्ष

प्रेह विहेयर' शिव मंदिरामुळे सीमावाद

1962 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कंबोडियाला मंदिराचा अधिकार

निर्णय अमान्य करत मंदिराच्या आसपासच्या जागेवर थायलंडचा दावा

2008मध्ये युनेस्कोचा मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा

2008 ते 2011 मंदिराच्या आसपासच्या भूखंडावरून दोन्ही देशात संघर्ष

दरम्यान वाढत्या सैन्य संघर्षामुळे दोन्ही देशांनी आपल्या राजदूतांना मायदेशी परत बोलवलय.तसचं थायलंडने कंबोडियासोबतच्या सर्व सीमा तात्पुरत्या बंद केल्या आहेत. त्यात थायलंड आणि कंबोडिया हे आसियानचे सदस्य आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील तणावामुळे आग्नेय आशियात अस्थिरता वाढू शकते, ज्यामुळे भारताच्या अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसीवर परिणाम होऊ शकतो. त्यात भारताचे कंबोडियाशी सांस्कृतिक आणि संरक्षणविषयक संबंध आहेत तर थायलंडबरोबरर व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे संघर्ष वाढण्याआधी आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही देशांना संयम राखण्याचे आणि चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन करण्यात आलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com