Terrorist Attacks In Kashmir: एका तासात तीन हल्ले; 3 नागरिकांचा मृत्यू

जम्मू काश्मीर मध्ये काल झालेल्या दहशदवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी एका तासाच्या आत तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्यांमध्ये तीन सामान्य लोकांना ठार केले आहेत.
Terrorist Attacks In Kashmir: एका तासात तीन हल्ले; 3 नागरिकांचा मृत्यू
Terrorist Attacks In Kashmir: एका तासात तीन हल्ले; 3 नागरिकांचा मृत्यूSaam Tv
Published On

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीर Jammu Kashmir मध्ये काल झालेल्या दहशदवादी हल्ल्यात Terrorist Attack दहशतवाद्यांनी एका तासाच्या आत तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्यांमध्ये तीन सामान्य लोकांना ठार केले आहेत. दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील Shrinagar प्रसिद्ध फार्मसीचे मालक माखनलाल बिंद्रू यांची त्यांच्या दुकानाच्या परिसरात गोळ्या घालून हत्या केली. त्याच वेळी, दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्येच दुसऱ्या हल्ल्यात एका रस्त्यावरील फेरीवाला ठार केले. तर तिसरा बंडीपोराच्या शाहगुंड हाजीनमध्ये झाली आहे. राज्यपालांनी या हत्यांचा तीव्र निषेध केला.

हे देखील पहा-

हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे वीरेंद्र पासवान, माखनलाल, मोहम्मद शफी अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, माखनलाल हे काश्मिरी पंडीत होते. त्यांचं श्रीनगर भागात औषधाचं दुकान होतं. तर वीरेंद्र पासवान हा फेरीवाला होता आणि तो मुळचा बिहारचा Bihar असल्याचं सांगण्यात आलं आहे. यानंतर मोहम्मद शफी हा बांदीपोरा येथील हाजीन भागात राहत होता. त्याचा रुग्णालयात उपचारासाठी Hospital नेत असताना वाटेतच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी, हल्ले झाल्यानंतर लगेचच या दहशतवाद्यांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये स्थानिक नागरिक हेच दहशतवाद्यांचे लक्ष्य होते. या तीन हल्ल्याच्या घटनांनंतर या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं. त्यामुळे जम्मू पोलिसही अधिक सक्रीय झाले आहेत. तर पूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com