Telangana Exit Poll Result: BRSच्या सत्तेला काँग्रेस'जोर का झटका' देणार? भाजपच्या पदरी निराशा; तेलंगणाचे एक्झिट पोल समोर

Telangana Assembly Election Exit Poll Result: तेलंगणाच्या ११९ विधानसभा जागांसाठी एकूण २२९० उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. तेलंगणाच्या निर्मितीपासून सलग दोन वेळा मुख्यमंत्री झालेले के. चंद्रशेखर राव आणि त्यांचा बीरआरएस पक्षच पुन्हा बाजी मारणार का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
Telangana Assembly Election Exit Poll Result
Telangana Assembly Election Exit Poll ResultSaamtv
Published On

Telangana Election Exit Poll Result:

तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी आज मतदान पार पडले. राज्यभरातील सर्व जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. तेलंगणाच्या ११९ विधानसभा जागांसाठी एकूण २२९० उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. तेलंगणाच्या निर्मितीपासून सलग दोन वेळा मुख्यमंत्री झालेले के. चंद्रशेखर राव आणि त्यांचा बीरआरएस पक्षच पुन्हा बाजी मारणार का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्याआधी विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार एक्झिट पोलचे आकडे येण्यास सुरूवात झाली आहे.

तेलंगणामध्ये (Telangana) गुरुवारी मतदान झाल्यानंतर एकूण २२९० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. विधानसभेच्या ११९ जागांपैकी १९ अनुसूचित जाती आणि १२ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. निवडणुका संपल्यानंतर विविध एजन्सीचे एक्झिट पोल प्रसिद्ध झाले आहेत. ज्यामध्ये कॉंग्रेस आणि बीआरएसमध्ये कॉंटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

एक्झिट पोल काय सांगतात?

राज्यात बीआरएसच्या सत्तेला काँग्रेस आव्हान देईल, असे जनमत वृत्तसंस्थेच्या एक्झिट पोल आकडेवारीमधून दिसत आहे. काँग्रेसला ४८-६४ जागा मिळू शकतात. तर बीआरएसला ४०-४५ जागा मिळू शकतात, तसेच भाजपसह इतर पक्षांना  ६ ते ८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Telangana Assembly Election Exit Poll Result
Rajasthan Exit Polls 2023 : राजस्थानमध्ये परंपरा मोडणार की भाजप येणार सत्तेत? एक्झिट पोलमध्ये कोणाला किती जागा? जाणून घ्या

तसेच आज तकच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला ५५ ते ६५ जागा, भाजपला २१- ३१ जागा तर, इतरांना ४- ८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत BRS ला सर्वाधिक ८८ जागा मिळाल्या. त्याखालोखाल काँग्रेसला १९, आयएमआयएमला सात, टीडीपीला दोन, भाजपला एक आणि एआयएफबीला एक जागा मिळाली. याशिवाय एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. (Latest Marathi News)

Telangana Assembly Election Exit Poll Result
MP Assembly Election Exit Poll : मध्य प्रदेशात कोणाची येणार सत्ता, काँग्रेस की भाजप? काय आहेत एक्झिट पोल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com