शिक्षेचा अतिरेक- उठाबशा काढायला लावून विद्यार्थीनीला केलं कायमचं अपंग

...शिक्षकांना इतका राग आला की तिला शेकडो उठा बश्या करण्याची शिक्षाच दिली.
शिक्षेचा अतिरेक- उठाबशा काढायला लावून विद्यार्थीनीला केलं कायमचं अपंग
शिक्षेचा अतिरेक- उठाबशा काढायला लावून विद्यार्थीनीला केलं कायमचं अपंगSaam Tv

शाळेत सर्व मुले खोकरपणा करतात. ही कोणती नवीन गोष्ट नाहीय की, वर्गात मुले टिफीन खाताना पकडली जातात किंवा त्यांनी काही टिफीनमध्ये असे स्नॅक्स (snacks) लपवले आहेत जे शाळेत आणू दिले जात नाहीत. चीनमध्ये सुद्धा, एक मुलीने असाच खोडकरपणा केला आहे. एका मुलीने शाळेच्या आवारात काही स्नॅक्स लपवून ठेवला होता. जे पाहून शिक्षकांना इतका राग आला की तिला शेकडो उठा बश्या करण्याची शिक्षाच दिली.

हे देखील पहा-

ही मुलगी 14 वर्षांची आहे. ती दक्षिण पश्चिम चीनच्या सिचुआन प्रांतातील एका हायस्कूलमध्ये शिकते. याबद्दल स्थानिक माध्यमांशी बोलताना मुलीची आई झोउने सांगितले की, ही घटना 10 जून रोजी रात्री 10 वाजता घडली होती. एका शाळेच्या शिक्षिकेला तिच्या मुलीच्या बसण्याच्या ठिकाणी काही स्नॅक्स सापडले होते. त्याबद्दल विचारल्यावर मुलीने ते तिचे नसल्याचेही सांगितले परंतु सांगूनही शिक्षकाने त्याला 300 उठा बश्या काढण्याची शिक्षा केली.

कठीण शिक्षेमुळे मुलगी अपंग;
मुलीला 300 उठा बश्या करण्याची शिक्षा केली आणि शिक्षिका तिथून निघून गेल्या. शिक्षेदरम्यान कोणतीही शिथिलता होऊ नये यासाठी शिक्षकाने तेथे उपस्थित असलेल्या आणखी एका शिक्षिकेची तिला पाहण्यासाठी नेमणूक केली. माहितीनुसार, एप्रिल 2020 मध्ये मुलीच्या पायाला दुखापत झाली होती. या शिक्षेबद्दल माहिती झाल्यानंतरही कोणीही ही शिक्षा थांबवली नाही. तब्बल 150 उठा बश्या केल्यानंतर मुलीची प्रकृती खालावली आणि तिचे पालक तिला शहरातील सर्व रुग्णालयात घेऊन गेले. अखेरीस डॉक्टरांनी सांगितले की, मुलगी कायमची अपंग झाली आहे, आणि तिला क्रॅचच्या मदतीने चालावे लागले. त्या दिवसापासून, मुलीला धक्का बसला आहे आणि तिला नैराश्याची औषधेही घ्यावी लागत आहेत.

शिक्षेचा अतिरेक- उठाबशा काढायला लावून विद्यार्थीनीला केलं कायमचं अपंग
Maharashtra Weather: IMD कडून 4 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

शाळेने नुकसान भरपाई दिली
जेव्हा शाळेला मुलीच्या या अवस्थेबद्दल कळले तेव्हा घटनास्थळी उपस्थित शिक्षक आणि कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. तर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले. स्थानिक अहवालांनुसार, शाळेला मुलीच्या पालकांना 13 लाख रुपयांची भरपाई देण्यास सांगितले गेले. परंतु पालकांनी स्वीकारण्यास नकार दिला. चीनमध्ये अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीही, ज्युडो कराटे प्रशिक्षकाने 7 वर्षांच्या मुलाला 27 वेळा मॅटवर फेकले होते ज्यामुळे त्याचा जीव गेला होता.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com