रांची : गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः.... गुरु शिष्यासाठी देवस्थानी असतो. शिक्षक देखील आपल्या विद्यार्थ्यांना एक चांगला नागरिक होण्यासाठी भविष्याची वाट दाखवत असतात. मात्र झारखंडमधील एका शिक्षकाने (Teacher) अत्यंत लज्जास्पद कृत्य केले आहे ज्यामुळे गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासली आहे.
पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील बराजमदा ओपी परिसरात असलेल्या खासजमदा सरकारी शाळेतील शिक्षक प्रेम कुमार दररोज शालेय मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर संतप्त झालेल्या महिलांना या शिक्षक आरोपीला चांगलाच चोप दिला आहे. महिलांनी या शिक्षकाचा चेहरा काजळाने काळा करत चप्पलांचा हार घालून संपूर्ण परिसरात मिरवणूक काढली. (National News)
आरोपी शिक्षक प्रेम कुमार गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींना जबरदस्तीने आपल्या जवळ घेऊन मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत होता. अल्पवयीन मुलींनी आरोपी शिक्षक करत असलेल्या अश्लील कृत्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली.
शिक्षकाच्या या दृष्कृत्याची माहिती मिळताच विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचा आणि स्थानिक ग्रामस्थांचा राग अनावर झाला. यानंतर मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला त्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता नागरिकांनी आरोपी शिक्षकाच्या तोंडाला काळं फासलं, चप्पलचा हार घालून संपूर्ण परिसरात फिरवले. महिलांनी आरोपी शिक्षक प्रेम कुमारला पोलिसांच्या स्वाधीन करून कठोर कारवाईची मागणी केली. (Latest Marathi News )
शाळेत शिकणाऱ्या मुली जेव्हा शौचास जात असत तेव्हाही आरोपी शिक्षक बळजबरीने मुलींच्या शौचालयात घुसायचा अशी माहिती मिळत आहे. विद्यार्थिनींनी विरोध केल्यावर आरोपी शिक्षक विद्यार्थिनींना मारहाण करत असे.
संतप्त महिला आणि पीडित विद्यार्थिनींनी शिक्षक प्रेमकुमारला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस उपायुक्तांना पत्रही दिले आहे. सध्या आरोपी शिक्षक प्रेमकुमारची बाराजमडा पोलिस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.