Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा संजय राठोड यांना मोठा धक्का; महंत सुनील महाराजांचा शिवसेनेत प्रवेश

संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावं यासाठी सुनील महाराज यांनी सर्वात जास्त प्रयत्न केले होते.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam Tv

मुंबई : दसरा मेळाव्याआधी (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का दिला आहे. संजय राठोच्या कठीण काळात त्यांच्यासोबत उभे असलेले पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांच्यासह इतर महंत मातोश्रीवर शिवबंधन हाती बांधलं आहे.

यावेळी उपस्थित महंत आणि कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली. संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावं यासाठी सुनील महाराज यांनी सर्वात जास्त प्रयत्न केले होते.

Uddhav Thackeray
Beed Farmer News: सावकाराच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकऱ्याच्या मुलीची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक, पत्र वाचून डोळे पाणावतील...

सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवी येथे येण्याचं निमंत्रण यावेळी दिलं. उद्धव ठाकरे यांनीही हे निमंत्रण स्वीकारलं असून, मी पोहरादेवीला नक्की येईन. पूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे. (Maharashtra News)

Uddhav Thackeray
CM शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये जोरदार भांडण? सूत्रांची साम टिव्हीला माहिती

सर्वाना वाटतं होत की शिवसेना संपली पण जास्तीत जास्त लोक आमच्याकडे येत आहेत. लढाईच्या काळात सोबत येतात त्यांना महत्व असतं, असंही त्यांनी म्हटलं. मात्र इतर कोणत्याही प्रश्नांवर त्यांनी बोलणं टाळतं दसरा मेळाव्यात बोलणार असल्याचं सांगितलं. (Maharashtra News)

सुनील महाराज यांनी पक्षप्रवेशावेळी म्हटलं की, आज पोहरादेवी येथे यात्रा आहे. तिथं दोन लाख भाविक आहेत तो मुहूर्त साधून मी साहेबांना भेटायला आलो आहे. अतिशय सकारात्मक चर्चा झाली. बंजारा समाजाला न्याय केवळ शिवसेना देऊ शकते. त्यासाठी आम्ही खंबीरपणे त्यांच्या मागे आहोत. संजय राठोड यांच्यासोबत होतो आता उद्धव साहेबांसोबत आहोत. आम्ही शिवसंकल्प दौरा ठेवणार आहोत. आता संजय राठोड यांना हद्दपार करणार की नाही हे जनताच ठरवेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com