विहंग ठाकूर
नवी दिल्ली : उद्योग क्षेत्रातील Industry देशातील प्रसिद्ध टाटा समुहाने TATA संकटात असलेली सरकारी विमान कंपनी Aeroplane Company एअर इंडिया AIR India खरेदी करण्यासाठी तिची बोली लावली होती. आता ही बोली टाटा कंपनीने जिंकली आहे. त्यामुळे आता एअर इंडियाची 68 वर्षानंतर लवकरच घरवापसी होणार आहे.
टाटा ग्रुपने एअरलाइन्सच्या नावाने एअर इंडियाची सुरुवात 1932 मध्ये केली होती. टाटा एअरवेज या भारतातल्या पहिल्या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीचं स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयीकरण Nationalization झालं आणि तेव्हा एअर इंडिया असं त्याच नामांतरण Renaming झालं. सध्याच्या घडीला एअर इंडिया कर्जबाजारी झाली होती. त्यामुळे या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने Modi Government घेतला. त्यानुसार, मोदी सरकारने 2018 मध्येच एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाचा प्रयत्न सुरू केला होता. पण त्यावेळी कंपनी खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवली गेली नाही. त्यानंतर अनेक कंपन्या एअर इंडिया खरेदीसाठी सकारात्मक होत्या. त्यासाठी टाटा कंपनीने देखील बोली लावली होती आणि आज टाटाने बोली जिंकली आहे. तब्बल 68 वर्षानंतर एअर इंडियाची टाटाकडे लवकरच वापस येणार आहे.
एअर इंडिया 68 वर्षांनंतर टाटा सन्सकडे परत आली आहे. यासाठी सरकारकडून बोली लावली गेली, सर्वाधिक बोली टाटा सन्सने लावली. टाटा सन्सने एअर इंडियाला 18 हजार कोटींमध्ये खरेदी केले आहे. टाटा सन्स व्यतिरिक्त स्पाईसजेटचे अजय सिंह ही या शर्यतीत सहभागी होते . अजय सिंह यांनी 15,100 कोटी रुपयांची बोली लावली.
टाटा सन्स आता एअर इंडियाचे नवे मालक असतील. सरकारने आज शुक्रवारी त्याची अधिकृत घोषणा केली. नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल , सचिव दिपम, DIPAM चे सचिव तुहिनकुमार पांडे यांनी याबाबत माहिती दिली. तर डिसेंबर 2021 पर्यंत व्यवहार पुर्ण होणार आहेत.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.