
तामिळनाडूमध्ये एक भयानक घटना घडली. चेंगलपट्टूच्या मदुरंतकम येथे एका तरुणाचा जिवंत मासा घशात अडकल्याने मृत्यू झाला. आर्यपक्कम गावातील मणिगंदन (२९ वर्षीय) हा तरुण मदुरंतकम येथील एका तलावात मासेमारी करत होता. यावेळी माशाने त्याचा जीव घेतला.
मंगळवारी नेहमीप्रमाणे त्याने मासा पकडला पण हा मासा त्याच्या घशात अडकल्यामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, २९ वर्षीय मणिकंदन हा रोजंदारीवर काम करत होता. त्याला तलावामध्ये मासेमारी करण्याची सवय होती. नेहमीप्रमाणे तो मासेमारीला गेला पण घरी परत आलाच नाही.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मणिकंदन अनेकदा त्याच्या मित्रांसह तलावात मासेमारी करायला जायचा. हाताने मासे पडकण्यासाठी तो प्रसिद्ध होता. अगदी काही वेळात तो अतिशय शिताफीने मासे पकडायचा. मंगळवारी तो नेहमीप्रमाणे तलावात मासे पकडण्यासाठी गेला पण यावेळी मदतीसाठी त्याच्यासोबत एकही मित्र नव्हता. त्यामुळे मासे पकडण्यात त्याला अडथळा येत होता.
मणिकंदमने एक मासा हाताने पकडला. त्यानंतर दुसरा मासा पकडण्यासाठी त्याने आधी पकडलेला मासा तोंडात दाबून ठेवला जेणेकरून पकडलेला मासा पुन्हा पाण्यात पडू नये. पण दुसरा मासा पकडण्याच्या नादात मणिकंदनने तोंडात ठेवलेला मासा त्याच्या तोंडात जातो आणि घशात अडकतो. श्वास अडकल्यामुळे तो तडफडू लागतो. यातच त्याचा मृत्यू होतो.
मणिकंदनच्या घशात मासा जातो आणि तो श्वसननलिकेत अडकतो. ज्यामुळे त्याला गुदमरल्यासारखे वाटू लागते. आजूबाजूला कोणी नसल्याने घाबरून मणिकंदन जवळच्या अरैयप्पक्कम गावाकडे धावला. पण मदत पोहोचण्यापूर्वीच वाटेतच तो रस्त्यावर पडतो. हे पाहून आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी माशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने गावकऱ्यांना ते करता आले नाही कारण माशाचा मागील काटेरी भाग श्वसनमार्गात अडकला होता. स्थानिक लोकांनी त्याला तात्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.