
मुंबईत २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकेतून दिल्लीत आणण्यात आले आहे. याच दरम्यान पाकिस्तानने तहव्वूर राणाबाबत मोठं विधान केलंय. तहव्वूर राणा आणि पाकिस्तानचा काय संबंध होता याबाबत पाकिस्तानकडून माहिती देण्यात आलीय. पाकिस्तानच्या परराष्ट्रीय कार्यालयाकडून तहव्वूर राणाबाबत विधान करण्यात आले आहे.
राणा आणि पाकिस्तानचा कोणताच संबंध नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आलाय. तहव्वूर राणाने गेल्या दोन दशकांत पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाहीये. त्यामुळे आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. तो आता कॅनेडियन नागरिक आहे," अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या परराष्ट्रीय कार्यालयाकडून देण्यात आलीय.
मूळ पाकिस्तानचा असलेला राणा हा कॅनडाचा नागरिक आहे. दरम्यान पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयशी राणाचे संबंध होते. हे लपवून राहिले नाहीये. त्यामुळेच भारत २६/११ च्या हल्लाचा तपास करताना त्या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध जोडेल, अशी भीती पाकिस्तानातील जाणकारांना आहे, त्यामुळे पाकिस्तानने राणापासून दोन हात लांब राहणं पसंत केल्याचं दिसत आहे.
२००८ च्या मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणा हा मुख्य आरोपी असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेतून प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला भारतात आणले गेले. तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहव्वूर राणाला दिल्लीतील तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे. यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. तहव्वूर राणाला एका विशेष विमानाने भारतात आणण्यात आले. हे विमान दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरण्यात आले. यानंतर एनआयएला अटक केली आहे. पालम विमानतळाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय.
तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहव्वूर राणाला दिल्लीतील तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल. यासाठीची तयारी पूर्ण झालीय. अंतिम निर्णय न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून असणार आहे. २६नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबई विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. यात अनेकजण जखमी झाले होते. या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा असल्याचं म्हटलं जात होते. तहव्वूर राणावर हल्ल्याचा कट आखण्यात मदत केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात वाचलेले नटवरलाल रोटवान म्हणाले, "जेव्हा तहव्वूर राणाला फाशीची शिक्षा सुनावण्यात येईल तेव्हा भारताचे कौतुक होईल. मी (चाचणीदरम्यान) दहशतवादी कसाबला ओळखले होते. तहव्वुर राणा नंतर, डेव्हिड हेडली, हाफिज सईद असतील."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.