नवी दिल्ली: 'दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए' अशी म्हण आहे. काल (२१ मार्चला) दिल्लीतील राष्ट्रपती भवनात असाच काहीसा प्रत्यय आला. देशाचा सर्वोच्च नेता म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, (PM Modi) देशाचे प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्यासह गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि अनेक दिग्गज एका १२५ वर्षांच्या वृद्धासमोर झुकले. हा दुर्मिळ प्रसंग घडला तेव्हा राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) पद्म पुरस्कारांचा (Padma Awards) वितरण सोहळा संपन्न होत होता. यात वयवर्षे १२५ असलेले योगगुरु स्वामी शिवानंद (Swami Shivanand) यांनादेखील पद्मश्री पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. (Guru Swami Sivananda receives Padma Shri award)
हे देखील पहा -
25 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. याच एकूण 128 नावे निवडण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी पद्म पुरस्कार विजेत्यांना पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान केली. या १२८ नावांपैकी एक नाव स्वामी शिवानंद यांचेही आहे, ज्यांना योग क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 125 वर्षांचे स्वामी शिवानंद (YogaGuru Swami Shivanand) राष्ट्रपती भवनाच्या प्रासादिक दरबार हॉलमध्ये अनवाणी आले तेव्हा सगळ्यांनी उभ रहात त्यांना अभिवादन केलं.
यावेळी 125 वर्षीय स्वामी शिवानंद पद्मश्री स्वीकारण्यासाठी आले तेव्हा त्यांनी असे काही केले की संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला. राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी स्वामी शिवानंद यांनी राष्ट्रपती भवनात तीनवेळ डोकं टेकवलं. योगगुरूंनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींना साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर पंतप्रधानांनीही स्वतः वाकून त्यांना नमस्कार केला. यानंतर स्वामी शिवानंद हे राष्ट्रपतींसमोही नतमस्तक होत त्यांना नमस्कार केला. यावेळी राष्ट्रपतीही एक पायरी खाली उतरुन खाली वाकत त्यांना नमस्कार केला. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उभे राहिल्याने इतर लोकंही उभे राहिले. यावेळी अनेक प्रोटोकॉल्स तुटले, पण हा भावनिक क्षण अवघ्या देशासाठी प्रेरणादायक ठरला.
कोण आहेत स्वामी शिवानंद?
स्वामी शिवानंद यांचा जन्म 8 ऑगस्ट 1896 साली स्वातंत्र्यपुर्व भारतातील सिल्हेट जिल्ह्यात (आता बांगलादेशात) झाला. स्वामी शिवानंद यांनी वयाच्या सहाव्या वर्षी आई आणि वडील गमावले. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना पश्चिम बंगालमधील नबद्वीप येथील गुरुजींच्या आश्रमात आणण्यात आलं. जिथे त्यांचे पालनपोषण गुरु ओंकारानंद गोस्वामी यांनी केलं. त्यांनी स्वामी शिवानंद यांना कोणत्याही शालेय शिक्षणाशिवाय योगासह सर्व व्यावहारिक आणि आध्यात्मिक शिक्षण दिलं.
गेल्या 50 वर्षांपासून स्वामी शिवानंद हे पुरी येथील 400 ते 600 कुष्ठरोगग्रस्त रुग्णांची सेवा करत आहेत. स्वामी शिवानंद यांना 2019 मध्ये बेंगळुरू येथील योगरत्न पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर 21 जून 2019 रोजी जागतिक योग दिनी योग प्रात्यक्षिकात ते सर्वात ज्येष्ठ सहभागी होते. 30 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांना समाजातील योगदानाबद्दल रिस्पेक्ट एज इंटरनॅशनलतर्फे वसुंधरा रतन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे स्वामी शिवानंद यांच्या या वयातही त्यांच्या तब्येतीबद्दल लोकांना आश्चर्य वाटते. वयाच्या १२५ व्या वर्षी लसीकरण केल्यानंतर त्यांनी देशवासियांनाही कोविड लसीकरणासाठी प्रेरित केलं होतं.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.