Sex Work In India: 'सेक्स वर्क'ला व्यवसाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

Supreme Court Recognises Sex Work As a Profession : सेक्स वर्कर्सला इतर नागरिकांप्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे.
Supreme Court Recognises Sex Work As a Profession
Supreme Court Recognises Sex Work As a ProfessionSaam Tv

नवी दिल्ली: वेश्याव्यवसाय (Sex Work) करणाऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने वेश्याव्यवसायाला कायदेशीर पेशा (प्रोफेशन) म्हणून मान्यता दिली आहे. म्हणजेच इतर कोणत्याही नोकरी किंवा पेशाप्रमाणे वेश्याव्यवसाय करणे देखील कायदेशीर असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जर एखादी सेक्स वर्कर प्रौढ (१८ वर्षे वय पुर्ण असलेली व्यक्ती) असेल आणि ती स्वत:च्या इच्छेने या व्यवसायात असेल तर पोलिसांनी त्यांना त्रास देऊ नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (Sex Workers Supreme Court News)

हे देखील पाहा -

सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात घटनेच्या मुलभूत अधिकारांचा उल्लेख करताना कलम २१ चा संदर्भ दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, व्यवसाय कोणताही असो, या देशातील प्रत्येक व्यक्तीला राज्यघटनेने सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, सेक्स वर्कर्सला इतर नागरिकांप्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. वय आणि संमतीच्या आधारावर फौजदारी कायदे लागू केले जावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. जर सेक्स वर्कर प्रौढ असेल आणि तिच्या संमतीने असे करत असेल तर पोलिसांनी अशा कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करणे टाळावे असा आदेश न्यायालयाने दिला आहे. (Sex work not a crime, should not abuse sex workers: SC)

Supreme Court Recognises Sex Work As a Profession
धोक्याची घंटा! 15 दिवसांत तब्बल 15 देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार

सेक्स वर्कर्सना अटक किंवा शिक्षा नको

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने कलम १४२ अंतर्गत विशेष अधिकारांच्या संदर्भात हा आदेश दिला आहे. कोर्टाने असेही म्हटले आहे की, जेव्हा-जेव्हा वेश्यागृहावर छापा टाकला जातो तेव्हा सेक्स वर्कर्सना अटक किंवा शिक्षा केली जाऊ नये. दिल्लीतून प्रकाशित होणार्‍या 'द हिंदू' या राष्ट्रीय वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com