Nagaland Reservation: भाजपाशासित राज्य सरकारांवर कारवाई का करत नाही? सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारले

Supreme Court Questions Modi Government: भाजपशासित राज्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे निरिक्षण यावेळी न्यायालयाकडून नोंदवण्यात आले.
Supreme Court
Supreme Court Saam TV
Published On

प्रमोद जगताप, प्रतिनिधी...

Delhi News: सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी नागालँडमधील महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. यावरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलेच फटकारले. तसेच भाजपशासित राज्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे निरिक्षणही यावेळी न्यायालयाकडून नोंदवण्यात आले.

Supreme Court
Sangli News : राज्यभरात पावसाची हजेरी जत तालुका काेरडाच, काँग्रेस आमदारासह 65 गावांनी कर्नाटकात जाण्याची केली मागणी (पाहा व्हिडिओ)

याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मंगळवारी नागालँडमधील (Nagaland) महिला आरक्षणावरील सुनावणी दरम्यान कोर्टाने केंद्र सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले. ज्या राज्यांमध्ये भाजपाचं (BJP) सरकार आहे, तिथे कारवाई करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरतं. मात्र, जिथे बिगर भाजपा सरकार आहे, तिथे केंद्र सरकारकडून कठोर पावलं उचलली जातात, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले.

“तुम्ही तुमच्याच पक्षाच्या (भाजपा) राज्य सरकारांविरुद्ध कारवाई का करत नाही? ज्या राज्यात तुमचं सरकार नाही, तिथे तुम्ही कठोर भूमिका घेता. पण ज्या राज्यात तुमच्या पक्षाचं सरकार आहे, तिथे काहीही करत नाही,” असा सवाल सुप्रीम कोर्टाकडून विचारण्यात आला.

Supreme Court
Maharashtra Rain: पुढील ५ दिवस महत्वाचे! २९ जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र पाऊस बरसणार; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

काय आहे नागार्लंडचा महिला आरक्षण प्रश्न...

न्यायालयाने नागालँड सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला (SEC) महिलांच्या ३३ टक्के आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. पण नागालँड सरकारने संबंधित निर्देशांचं पालन न केल्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज सुनावणी पार पडली. दरम्यान, न्यायालयाने ही निरीक्षणं नोंदवत केंद्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com