सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

Supreme Court Questions Rahul Gandhi-Led Protest: SIR विरोधातील इंडिया आघाडीच्या लढाईला न्यायालयीन वळण लागलंय. राहुल गांधींच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचे आदेश दिलेत. सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?... कोर्टानं काय आदेश दिलेत?... पाहूयात या रिपोर्टमधून...
SIR CASE: SUPREME COURT NOTICE TO GYANESH KUMAR, RAHUL GANDHI IN FOCUS
SIR CASE: SUPREME COURT NOTICE TO GYANESH KUMAR, RAHUL GANDHI IN FOCUSsaam tv
Published On: 

SIR आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील लढा आता कोर्टात पोहोचलाय. विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी थेट सुप्रीम कोर्टावर धडक देत ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका दाखल केलीये. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमारांसह इतर दोन निवडणूक आयुक्तांना नोटीस पाठवलीये. विशेष म्हणजे, आंदोलनातील वर्तनावरूनही कोर्टानं राहुल गांधींचं नाव न घेता फटकारलंय. इंडिया आघाडीच्या याचिकेवरील सुनावणीत कोर्टात नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...

सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?

- मुख्य निवडणूक आयुक्तांसह दोन्ही निवडणूक आयुक्तांनाही नोटीस

- सुप्रीम कोर्टाला कुणीही धमकावू शकत नाही

- याचिकाकर्त्याला वर्तणुकीबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागेल

- सुप्रीम कोर्टावरील मोर्चावरून नाव न घेता राहुल गांधींना कोर्टानं फटकारलं

- राहुल गांधींच्या कोर्टातील वर्तणुकीवर स्पष्टीकरण मागितलं

- कोर्ट परिसरातील CCTV आणि इतर रेकॉर्ड जपून ठेवा

तर सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावल्यानंतर ज्ञानेश कुमारांविरोधात कारवाई होणार असल्याचा आशावाद विरोधी पक्षां नी व्यक्त केलाय.

देशभरात SIR विरोधात दिवसेंदिवस वातावरण चांगलंच तापताना दिसतंय. अशातच आता सुप्रीम कोर्टातील लढाईनं इंंडिया आघाडीच्या लढ्याला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे,SIRबाबतच्या आक्षेपांना उत्तर देताना सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनेच ‘फॉर्म 6’ बदलल्याचा दावा निवडणूक आयोगानं केला होता.

मात्र, यासंदर्भातील याचिकेवर बदलांना संमती दिली नसल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होत. त्यामुळे निवडणूक आयोगाचा हा दावा फोल ठरला होता. याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला निवडणूक आयोग काय उत्तर देतं... तसंच, विरोधकांची पुढची न्यायालयीन लढाई नेमकी कशी असणार?... याकडे देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com