Supreme Court : हिंडनबर्ग प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; केंद्र सरकार काय भूमिका मांडणार?

हिंडनबर्ग प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात अदानी ग्रुपच्या विरोधात हिंडनबर्गने सादर केलेल्या अहवाला संदर्भात सुनावणी पार पडणार आहे.
Supreme Court
Supreme CourtSaam Tv
Published On

Hindenburg Latest News : उद्योजक गौतम अडानी यांच्याविरोधात हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या धक्कादायक आरोपांनंतर देशात चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही लोकसभेत यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. या हिंडनबर्ग प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात अदानी ग्रुपच्या विरोधात हिंडनबर्गने सादर केलेल्या अहवाला संदर्भात सुनावणी पार पडणार आहे. (Latest Marathi News)

गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सेबीच्या वतीने बाजू मांडणाऱ्या भारताचे महाधीवक्ता तुषार मेहता यांना तुम्ही भारताच्या गुंतवणूकदारांचे रक्षण कसं करणार? असा सवाल उपस्थित केला होता. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या सर्व प्रकरणासंदर्भात १३ जानेवारी पर्यंत उत्तर मागितले होते.

सर्वोच्च न्यायालयाने सेबी आणि अर्थ मंत्रालयास देखील या सर्व प्रकरणासंदर्भात नोटीस बजावली होती. त्यामुळं आज केंद्र सरकार (Central Government) सर्वोच्च न्यायालयात काय भूमिका मांडते हे पाहणं महत्त्वाचे आहे.

Supreme Court
Shivsena vs BJP : मोदी एकटे नाहीत, त्यांच्यासोबत साप, विंचू, मगरी.., सामनातून जहरी टीका

अदानी समुहाविरोधात हिंडनबर्गच्या अहवालाशी संबंधित 2 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहे. वकील एम एल शर्मा आणि विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत अमेरिका स्थित हिंडेनबर्गने अदानींचे शेअर्स शॉर्ट सेल केल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले असल्याचा दावा केला आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. यावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे.

Supreme Court
Adani Row : अदानी वादावरून राजकारण तापलं; काँग्रेसने बोलावली तातडीची बैठक, राज्यसभेत आज काय होणार?

काय आहे हिंडनबर्ग ?

हिंडनबर्ग रिसर्चने जगभरातील अनेक कंपन्यांचा भांडाफोड केला आहे. २०१७ साली या संशोधन संस्थेची स्थापना नाथन एंडरसनने केली होती. जगभरातील कंपन्यांवर आर्थिक संशोधन करणारी संस्था आहे. इक्विटी, क्रेडिट आणि डेरिवेटिव्हसचे विश्लेषण, संशोधन करून ही संस्था अहवाल तयार करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com