
Superbug : गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाने त्रस्त आहे. एकीकडे, दरवर्षी नवीन प्रकारासह, ही महामारी लोकांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील कमकुवत करत आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेत लोकांमध्ये वेगाने पसरणाऱ्या एका सुपरबगने संपूर्ण जगाला पुन्हा चिंतेत टाकले आहे.
गेल्या काही वर्षांत सुपरबग जिवाणू सुपरबग वैद्यकीय शास्त्रासमोर एक मोठे आव्हान म्हणून समोर आला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग अधिक धोकादायक बनत आहे. हा सुपरबग याच वेगाने पसरत राहिला तर दरवर्षी १ कोटी लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या सुपरबगमुळे जगभरात दरवर्षी 1.3 दशलक्ष लोकांचा मृत्यू होत आहे. अँटीबायोटिक्स आणि अँटी-फंगल औषधे देखील सुपरबगवर परिणाम करत नाहीत, असे लॅन्सेटच्या अभ्यासातून समोर आले आहे.
सुपरबग काय आहे?
हा जीवाणूंचा एक प्रकार आहे. काही जीवाणू मानवासाठी अनुकूल असतात तर काही मानवांसाठी अत्यंत धोकादायक असतात. हा सुपरबग मानवांसाठी घातक आहे. हा जीवाणू, विषाणू आणि परजीवी यांचा एक प्रकार आहे. जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा परजीवी हे काळानुसार बदलतात, त्यावेळी औषधांचा त्यांच्यावरील परिणाम कमी होते. त्यामुळे संसर्गावर उपचार करणे खूप कठीण होते.
हा धोकादायक बग कसा पसरतो?
त्वचेचा संपर्क, जखमा, लाळ आणि लैंगिक संपर्काद्वारे सुपरबग हा आजार पसरू शकतो. सुपरबगवर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही, परंतु योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास या आजरा पासून आपण दूर राहू शकतो.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.