
Pankaja Munde News : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी नड्डा यांची दुपारी चंद्रपुरात सभा झाली आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. दरम्यान जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमापासून भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा रंगली होती.
जे.पी नड्डा यांच्या औरंगाबादेतील कार्यक्रमाच्या पत्रिकेवरवरून पंकजा मुंडे यांचा फोटो डावलण्यात आला. कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचा फोटो नव्हता. त्यामुळे पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, यावर आता खुद्द पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
निमंत्रण पत्रिकेत माझं नाव असण्याचं काही कारण नाही, कारण हा लोकसभा मतदारसंघ माझा नाही, म्हणून मी नाराज आहे म्हणणं चुकीचं आहे. मला भाषणासाठी कमी वेळ दिला हे म्हणणंही चुकीचं आहे, कारण वेळ कमी होता आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचं भाषण महत्तावचं होतं,' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
'गोपीनाथ मुंडे होते त्यावेळीही आणि त्यांच्यानंतरही माझा संघर्ष सुरूच आहे. संघर्षातून शिकायला मिळतं. महापुरुषांबद्दल बोलणं टाळलं पाहिजे. सर्वच महापुरुषांच्या नशिबी संघर्ष होता, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. तसेच पक्षाचे आदेश मानणं हे माझ्यावरचे संस्कार आहेत. तसंच भाजपला जिंकवून देण्याचं आवाहन करत भाषण संपवलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.