Sudha Murty: साधेपणा असावा तर असा! अब्जाधीश सुधा मुर्तींचा 'तो' फोटो होतोय व्हायरल; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Infosys चे संस्थापक श्री नारायण मूर्ती यांच्या पत्नी ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या सासू असलेल्या सुधामुर्तींचा साधेपणा नेटकऱ्यांना भावला आहे...
Sudha Murty
Sudha MurtySaamtv

Sudha Murty Viral Photo: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या पत्नी आणि समाजसेविका सुधा मूर्ती आपल्या साधेपणासाठी ओळखल्या जातात. इन्फोसिस ही जगातील सर्वात मोठी टेक कंपनींपैकी आहे. पण यशाच्या शिखरावर असूनही सुधा मुर्ती त्यांच्या साधेपणासाठी ओळखल्या जातात. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या एका फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये त्यांचा साधेपणा पाहून नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Sudha Murty
H3N2 Influenza: काळजी घ्या! नव्या संसर्गाने वाढवलं टेंन्शन; गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, नीती आयोगाचं आवाहन

सुधा मुर्ती (Sudha Murty) या एक यशस्वी उद्योजिका, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अलिकडेच त्यांचे जावई ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली होती, ज्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. पती एवढ्या मोठ्या कंपनीचे संस्थापक आणि जावई ब्रिटनचा पंतप्रधान असूनही त्यांनी आपली साधी राहणी बदलेली नाही. आजही त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये कमालीचा आपलेपणा आहे. यातच आता सुधा मुर्ती यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात त्या मंदिरात जमिनीवर बसून जेवण बनवताना दिसत आहेत.

Sudha Murty
Ambernath Fire News : मोठी दुर्घटना!अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग; घटनेत लाखोंचे नुकसान

हा फोटो पोंगल उत्सवानिमित्त तिरुवअनंतपुरममध्ये आयोजित कार्यक्रमातील असल्याची माहिती समोर आली असून या कार्यक्रमाला सुधा मुर्ती यांनी हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमात त्या इतर शेकडो महिलांप्रमाणे अगदी साधेपणाणे वावरल्या. यावेळी त्यांनी मंदिरात खाली जमिनीवर बसून जेवणही बनवलं. भाजप नेते पीसी मोहन यांनीही ट्विटरवरुन सुधा मुर्ती यांचा फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर सध्या या फोटोची चर्चा होत असून साधेपणा असावा तर असा असे म्हणत नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, सुधा मूर्ती या एक स्पीकर आणि लेखिका म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. आपल्या साधेपणामुळे त्या नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com