सुदानच्या (Sudan) पश्चिम कोर्डोफान प्रांतात (West Kordofan Province) मंगळवारी सोन्याची खाण कोसळून (Gold mine collapsed) किमान 38 जणांचा मृत्यू झाला आहे, अधिकाऱ्यांनी या बाबत माहिती दिली आहे. सुदानच्या सरकारी खाण कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की राजधानी खार्तूमच्या दक्षिणेस 700 किमी अंतरावर असलेल्या फुजा गावातील बंद खाणीत हा अपघात झाला. या अपघातात काही जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. खाण कंपनीने फेसबुकवर काही फोटो पोस्ट केली आहेत ज्यात गावकरी दिसत आहेत.
फोटोंमध्ये दुर्घटनेत वाचलेले आणि मृतदेह शोधण्यासाठी काम करणार लोक दिसत आहेत. इतर फोटोंमध्ये, लोक मृतांना दफन करण्यासाठी कबरे तयार करताना दिसतात. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की या खाणीत कसलेही काम होत नव्हते. गावातील लोकांनी सैनिकांचे लक्ष नसताना सोन्याच्या हव्यासापोटी खाणीत प्रवेश केला आणि हा अपघात घडला. मात्र असे केल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. खाणीचे काम कधी थांबवले हे कंपनीने सांगितलेले नाही.
सुदानमध्ये खाणकाम असुरक्षित का आहे?
एक दशकापूर्वी, जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असलेल्या सुदानमध्ये महागाईने उच्चांक गाठला होता. यानंतर सोन्याच्या खाणीचे काम येथे भरभराटीस येऊ लागले आणि खाणकामातून लोक पैसे कमवू लागले. देशभरात सुमारे 20 लाख लोक सोने शोधण्यासाठी पारंपरिक खाण कामगार म्हणून काम करतात. ते अनेकदा सुदानमध्ये बेकायदेशीर खाणींमध्ये काम करतात. जेथे परिस्थिती अत्यंत असुरक्षित आहे आणि पायाभूत सुविधा पूर्णपणे जीर्ण आहेत. ही अनिश्चित परिस्थिती असूनही, अधिकृत आकडेवारीनुसार, सुदानमधून काढलेले 80 टक्के सोने या कामगारांनी काढले आहे.
आकडेवारीनुसार, 2020 मध्ये पूर्व आफ्रिकेतील सुदानमध्ये 36.6 टन सोने काढण्यात आले आहे. संपूर्ण खंडातील कोणत्याही देशाने काढलेले हे दुसरे सर्वोच्च सोने आहे. त्याच वेळी, गेल्या दोन वर्षांपासून, सुदान सरकारने खाण उद्योगाचे नियमन सुरू केले आहे. देशातून सोन्याची तस्करी होण्याचा धोका असताना हे केले जात आहे. परंतु 25 ऑक्टोबरला सत्तापालट झाल्यापासून देश राजकीय संकटात सापडला आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही झाला आहे. आफ्रिकन देशांमध्ये खाणकाम सामान्य आहे. जवळच्या काँगो देशातही अशाच घटना समोर येत आहेत.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.