जोधपूर, राजस्थान : आज देशभरात मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जात आहे. मात्र ईदच्या दिवशी राजस्थानच्या (Rajsthan) जोधपूरमध्ये दगडफेक (Stone pelting) झाल्याची समोर येत आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर परिसरातील इंटरनेट (Internet Shutdown) सेवा बंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमध्ये (Jodhpur) सोमवारी संध्याकाळी ईदच्या पूर्वसंध्येला जलौरी गेट परिसरात झेंडा (Flag) फडकवण्यावरून वाद झाला होता. यानंतर दोन गटांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर जोधपूरमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले असून पोलिस संरक्षणात ईदची नमाज अदा करण्यात आली. याबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. (Stone pelting in residential areas after communal clash on Eid; internet suspended)
हे देखील पाहा -
जोधपूरमध्येही तीन दिवसीय परशुराम जयंती उत्सव सुरू आहे. यावेळी दोन गटातील लोकांनी आपापले धार्मिक झेंडे लावले. त्यामुळे या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. प्रकरण इतके वाढले की जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तसेच स्थानिक भागातील पोलीस चौकीवर हल्ला झाल्याचेही वृत्त आहे. जोधपूरमधील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. याबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, जोधपूरच्या जालोरी गेट येथे २ गटांमधील झालेला संघर्षात दुर्भाग्यपूर्ण आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे. असं आवाहन करत "प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीत शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत." असं ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत पुढे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जोधपूर, मारवाडच्या प्रेम आणि बंधुभावाच्या परंपरेचा आदर करत मी सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करतो असं ट्विट त्यांनी केलं आहे. यावेळी पोलिसांचा पत्रकारांशी वाद झाला. पत्रकारांवरही लाठीमार करण्यात आला. त्याचवेळी एक पत्रकारही जखमी झाला. याच्या निषेधार्थ पत्रकार रस्त्यावरच धरणे आंदोलनासाठी बसले. यादरम्यान पुन्हा इदगाह रस्त्यावरून लोक शस्त्रांसह जमा झाले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी पुन्हा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या घटनास्थळी तणाव कायम आहे. पोलिसांनी आरएसी तैनात केले आहे. तसेत डीसीपी पूर्व आणि पश्चिम घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.