Kulgam Encounter : लपून बसलेल्या ५ दहशतवाद्यांना जवानांनी शोधून टिपलं; रात्रभर सुरू होती धुमश्चक्री

Kulgam Encounter Latest Update : सुरक्षा दलांना गुरुवारी या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी समनो गावाला सर्व बाजूंनी घेराव घातला.
Kulgam Encounter, Jammu Kashmir Updates
Kulgam Encounter, Jammu Kashmir UpdatesSAAM TV

Jammu Kashmir Kulgam Encounter :

दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील समनू गावात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे सर्व दहशतवादी लश्कर-ए-तोयबा आणि टीआरएफशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.

रिपोर्टनुसार, या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या जवानांनी गुरुवारी सकाळी शोधमोहीम सुरू केली. कुलगामच्या नेहामा परिसरात शुक्रवारी पहाटे गोळीबार सुरू झाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना गुरुवारी या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी समनो गावाला सर्व बाजूंनी घेराव घातला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसर पिंजून काढला. सर्च ऑपरेशन अधिक वेगाने सुरू केले. त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्यांना जवानांनी प्रत्युत्तर दिले. ज्या ठिकाणी दहशतवादी लपून बसले होते, ते ठिकाण चहूबाजूने घेरले होते. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत आतापर्यंत ५ दहशतवादी मारले गेल्याची माहिती मिळते.

Kulgam Encounter, Jammu Kashmir Updates
Uttarakhand Tunnel Accident: स्पेशल विमान आणि मशीन....; बोगद्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या ४० कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोठा प्लान

जम्मू - काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये एलओसीजवळ मागील बुधवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला होता. दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली होती.

एलओसीजवळ संशयास्पद हालचाली सुरू होत्या. सुरक्षा दलाच्या जवानांच्या ते निदर्शनास आले. त्यांनी घुसखोरी रोखण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवादी मारले गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Kulgam Encounter, Jammu Kashmir Updates
MP Election 2023: मध्य प्रदेशमध्ये मतदान केंद्राबाहेर दगडफेक, दोन गटात राडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com