नवी दिल्ली : श्रीलंकेतील (Srilanka) लोकांवर मोठं राजनैतिक संकट कोसळलं आहे. वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, भारनियमन, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी या संकटांचा (Crisis) सामना श्रीलंकन नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी सोमवारी त्यांच्या पंतप्रधानाचं घरही जाळलं. त्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. परंतु तरीही श्रीलंकन नागरिकांकडून रस्त्यावर उतरत हिंसाचार आणि वाहनांची जाळपोळ सुरू आहे. नागरिकांचे हिंसक आंदोलन दाबण्यासाठी श्रीलंकेच्या संरक्षण खात्याने 'शूट ऑन साइट'चे आदेश जारी केले आहेत. ( Sri Lanka crisis Latest News )
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेची आर्थिक स्थिती बिघडल्यानंतर तेथील नागरिकांनी रस्त्यावर उतरत जाळपोळ आणि हिसांचार करायला सुरुवात केली. या हिंसेत श्रीलंकन नागरिकांनी अनेक नेत्यांचे घरेही जाळली. तसेच श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajpakshe) यांचे वडिलोपार्जित घर देखील आंदोलकांनी जाळले. सोमवारी झालेल्या हिंसेत खासदारासहित पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर श्रीलंकेच्या आर्थिक संकटाला जबाबदार म्हणून मंहिदा राजपक्षे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतरही हिंसाचार सुरूच आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या संरक्षण खात्याने 'शूट ऑन साइट'चे आदेश जारी केले आहेत. यावरून श्रीलंकेत तणाव आणखी वाढल्याचे दिसून येत आहे.
श्रीलंकन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना शांतता राखण्याचे आणि हिंसाचार थांबवण्याचे, असे आवाहन केले आहे. तसेच पुढे म्हणाले की, संविधानिक जनादेशाच्या माध्यमातून राजनैतिक स्थिरता आणि आर्थिक संकट दूर करण्याचे प्रयत्न केले जाईल, असेही यावेळी राजपक्षे यांनी सांगितले. महिंदा राजपक्षे यांचा मुलगा नमल यांनीही श्रीलंकेच्या स्थानिक वृत्तमाध्यमांना हिसांचारवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी नमल म्हणाले की, माझे वडील देश सोडून जाणार नाही. माझे वडील सुरक्षित आहेत. ते सुरक्षित ठिकाणी असून त्यांचा माझ्या कुटुंबाशी संवाद सुरू आहे'. श्रीलंकेत कर्फ्यू लागू केल्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. जमावाने मंगळवारी कोलंबोमध्ये पंतप्रधानाच्या घराजवळील श्रीलंकन पोलीस अधिकाऱ्यालाही मारहाण केली. तसेच त्याचे वाहनही जाळले. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्याला उपचारासाठी घरी पाठवल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.