Sri Lanka Arrested Indian: श्रीलंकेने 12 भारतीयांना केली अटक, कारवाईसाठी कनकेसंथुराई बंदराकडे रवाना

Sri Lanka Arrested Indian: श्रीलंकेच्या नौदलाने आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा ओलांडून श्रीलंकेच्या हद्दीत अवैध मासेमारी केल्याप्रकरणी १२ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. नौदलाने त्यांचा ट्रॉलरही जप्त केला आहे.
Sri Lanka Arrested Indian
Sri Lanka Arrested IndianSaam Digital
Published On

Sri Lanka Arrested Indian

श्रीलंकेच्या नौदलाने आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा ओलांडून श्रीलंकेच्या हद्दीत अवैध मासेमारी केल्याप्रकरणी १२ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. नौदलाने त्यांचा ट्रॉलरही जप्त केला आहे. मच्छिमारांना उत्तर जाफना द्वीपकल्पातील कराईनगरच्या किनाऱ्याजवळ अटक करण्यात आली असून कनकेसंथुराई बंदरात नेण्यात आलं आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मच्छिमारांचा मुद्दा भारत आणि श्रीलंका यांच्यात दीर्घकाळापासून वादग्रस्त राहिलेला आहे. २०२३ मध्ये श्रीलंकेन नौदलाच्या कर्मचार्‍यांनी भारतीय मच्छिमारांवर त्यांच्या समुद्र हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचा आरोप केला आणि त्यांच्यावर गोळीबारही केला होता. त्यांच्या बोटीही जप्त करण्यात आल्या. पाल्क सामुद्रधुनी ही तमिळनाडूला श्रीलंकेपासून वेगळे करणारी पाण्याची अरुंदपट्टी आहे. दोन्ही देशांतील मच्छिमारांसाठी हे एक समृद्ध मासेमारीचं ठिकाण आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sri Lanka Arrested Indian
Bharat Jodo Nyay Yatra: मला माफ करा..राहुल गांधी असं का म्हणाले?, बहुचर्चित'भारत जोडो न्याय यात्रे'ला इंफाळमधून प्रारंभ

आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा ओलांडून श्रीलंकेच्या समुद्र हद्दीत मासेमारी केल्याच्या आरोपाखाली भारतीय मच्छिमारांना अटक केल्याच्या घटना अधूनमधून घडत आहेत. 2023 मध्ये, श्रीलंकेच्या नौदलाने 240 भारतीय मच्छिमारांना 35 ट्रॉलरसह अटक केली होती.

Sri Lanka Arrested Indian
Actor Prakash Raj: पंतप्रधान मोदींवरील टीकेमुळे ३ पक्ष मला तिकीट देण्यासाठी आतुर- अभिनेता प्रकाश राज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com