Nestle News: सावधान! नेस्ले मुलांच्या आरोग्याशी खेळतेय का? बेबी फूडमध्ये भेसळ? मॅगीनंतर सेरेलॅक उत्पादन वादात

Nestle Controversies: नेस्ले ही बहुराष्ट्रीय कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे. कंपनीचं उत्पादन मॅगीमध्ये शिसाचं प्रमाण जास्त असल्याचा आरोप काही वर्षांपूर्वी झाला होता. आता कंपनीचं बेबी फुड 'सेरेलॅक' या उत्पादनावरुन वाद झाला आहे.
सावधान! नेस्ले मुलांच्या आरोग्याशी खेळतेय का? बेबी फूडमध्ये भेसळ? मॅगीनंतर सेरेलॅक उत्पादन वादात
NestleSaam Tv

Nestle Controversies :

नेस्ले ही बहुराष्ट्रीय कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे. कंपनीचं उत्पादन मॅगीमध्ये शिसाचं प्रमाण जास्त असल्याचा आरोप काही वर्षांपूर्वी झाला होता. आता कंपनीचं बेबी फुड 'सेरेलॅक' या उत्पादनावरुन वाद झाला आहे. स्वित्झर्लंडसारख्या विकसित युरोपीय देशांमध्ये नेस्लेच्या उत्पादनांमध्ये साखर टाकली जात नाही.

मात्र भारत, बांगलादेश आणि थायलंड यांसारख्या विकसनशील देशांमध्ये साखरेची भर घातली जात आहे, असा आरोप होत आहे. कंपनीचा हा भेदभाव समोर आल्यानंतर केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला नेस्ले समूहाविरुद्ध “योग्य कारवाई” करण्यास सांगितले आहे.

सावधान! नेस्ले मुलांच्या आरोग्याशी खेळतेय का? बेबी फूडमध्ये भेसळ? मॅगीनंतर सेरेलॅक उत्पादन वादात
Uddhav Thackeray: 'तुम्हाला शाहांनी मातोश्रीबाहेर बसवलं होतं', उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर सडकून टीका

स्विस तपास संस्था 'पब्लिक आय' आणि इंटरनॅशनल बेबी फूड ऍक्शन नेटवर्कने आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत विकल्या गेलेल्या कंपनीच्या बेबी फूड उत्पादनांचे नमुने बेल्जियमच्या प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले होते. सार्वजनिक करण्यात आलेल्या या अहवालात स्पष्टपणे म्हटलं आहे, की नेस्ले कंपनी गरीब देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या लहान मुलांच्या दुधात जास्त प्रमाणात साखर घालते. नेस्लेच्या दोन सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बेबी फूड ब्रँडमध्ये मोठ्या प्रमाणात साखर असल्याचे आढळून आले आहे. ही उत्पादने ब्रिटन, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि इतर विकसित देशांमध्ये मात्र साखरेशिवाय विकली जात आहेत. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकन देशांमध्ये कंपनीच्या उत्पादनांमध्ये नेस्लेचे उल्लंघन दिसून आले. अहवालानुसार, भारतातील उत्पादनात 3 ग्रॅम साखर आढळून आली. थायलंडमध्ये 6 ग्रॅम, फिलीपिन्समध्ये 7.3 ग्रॅम साखर असल्याचे आढळून आली आहे.

या अहवालाच्या पार्श्वभूमिवर नेस्ले कंपनीनं स्पष्टीकरण दिलंय. आम्ही आमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही आणि करणार नाही. साखर कमी करणे ही नेस्ले इंडियाची प्राथमिकता आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही उत्पादनानुसार साखरेचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत कमी केल्याचा दावा कंपनीनं केलाय.

सावधान! नेस्ले मुलांच्या आरोग्याशी खेळतेय का? बेबी फूडमध्ये भेसळ? मॅगीनंतर सेरेलॅक उत्पादन वादात
Maharashtra Politics: 'बहिणीचे जे हाल झाले, तेच भावाचे होणार', अंबादास दानवे यांचा महादेव जानकर यांना खोचक टोला

जागतिक आरोग्य संघटनेचे शास्त्रज्ञ निगेल रोलिन्स यांनीही या तपासणीच्या निष्कर्षांनंतर चिंता व्यक्त केली आहे. कंपनीचे हे पाऊल सार्वजनिक आरोग्य आणि नैतिक दृष्टिकोन या दोन्हींवर प्रश्न उपस्थित करते, असं म्हटलंय. मुलांमध्ये साखरेचा लवकर संपर्क आल्याने साखरेवर आधारित उत्पादनांचे आयुष्यभर आकर्षण होते. ज्यामुळे लठ्ठपणा आणि इतर रोगांचा धोका वाढतो. 2022 मध्ये, डब्ल्यूएचओने लहान मुलांसाठी अन्न उत्पादनांमध्ये साखरेचा समावेश करण्यावर बंदी घालण्याची सूचना केली होती. घराघरात पोहचलेलं सेरेलॅक बाळाला भरवताना आता पालकांनी थोडं जागृत राहणं गरजेचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com