Shraddha Walkar Case : आफताबच्या आई-वडिलांच्या अडचणी वाढणार? श्रद्धाच्या वडिलांचा गंभीर आरोप

Shraddha Walkar Murder : श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर आफताब पूनावाला याच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत.
Shraddha Walker Case aftab poonawala
Shraddha Walker Case aftab poonawalaSaam TV
Published On

Shraddha Walkar Murder Case Updates : दिल्लीत मागील वर्षी झालेल्या श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून टाकलं होतं. आरोपी आफताब पूनावाला याने आपली प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करत फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगलात फेकले. या हत्येनंतर चार ते पाच महिन्यांनी हे प्रकरण समोर आल्यावर आफताबला अटक झाली होती. (Latest Marathi News)

Shraddha Walker Case aftab poonawala
Pune Crime : पुण्यातील व्यावसायिकाला 99 लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

श्रद्धा वालकरच्या वडिलांचा गंभीर आरोप

सध्या याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशातच श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर आफताब पूनावाला याच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. आफताब पूनावालाच्या आई-वडिलांना कुठेतरी लपवण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये त्यांनी समोर येऊन बोललं पाहिजे, असं विकास वालकर यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर आफताबच्या आई-वडिलांना अद्याप समोर आणण्यात आलेलं नाही. मला वाटतं की ते कुठेतरी लपून बसलेले आहेत. ते नेमके कुठे आहेत? मी त्यांना समोर येण्याचं आवाहन करतो, असं विकास वालकर म्हणाले आहेत.

आपल्याला आपल्या मुलीचे म्हणजेच श्रद्धाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे आहेत. त्यासाठी तिच्या शरीराच्या तुकड्यांचे अवशेष मला दिले जावेत, अशी विनंती सुद्धा विकास वालकर यांनी केली आहे. (Breaking Marathi News)

Shraddha Walker Case aftab poonawala
Accident News: ड्युटी आटोपून जाताना अपघात; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

'आफताब पूनावलाला फाशी व्हायला हवी'

आफताब श्रद्धाच्या खूनप्रकरणी (Crime News) दोषी आहे. त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी. आफताबने पूर्णनियोजन करून श्रद्धाचा खून केला आहे. माझ्या वकिलाला फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण अपील करण्यात सांगितले आहे, अशी माहिती विकास वालकर यांनी दिली.

दरम्यान, विकास वालकर यांच्या वतीने वकील सीमा कुशवाहा या कोर्टासमोर बाजू मांडत आहेत. निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यासाठी ७ वर्षांचा कालावधी लागला. तितका या प्रकरणात लागू नये, अशी अपेक्षा सीमा यांनी व्यक्त केली.

आफताबसमोरच कोर्टात त्याच्या आणि श्रद्धाच्या ऑनलाइन काउन्सलिंगची ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग दाखवण्यात आलं. "तो मला शोधून माझी शिकार करेल," असं श्रद्धा या ऑडिओमध्ये बोलत असल्याचं समजतं. आफताबने एकदा आपला गळा पकडल्याचंही श्रद्धा या ऑडिओमध्ये सांगते.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com