
Shraddha Walker Case News Update : मुंबईजवळील वसईतील श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत ठोस पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यात आता एक नवीन फोटो समोर आला आहे. त्यामुळे मारेकरी आफताबचा क्रूर चेहरा अख्ख्या जगासमोर आला आहे.
श्रद्धाचा फोटो तिच्या एका मित्रानं प्रसिद्ध केला आहे. आफताब तिला किती मारहाण करायचा हे यातून दिसून येतं. श्रद्धाच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा दिसत आहेत. यावरून आफताब तिला किती मारहाण करायचा हे दिसून येत आहे. हा फोटो डिसेंबर २०२० चा असल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)
श्रद्धाचा पहिलाच फोटो समोर आला आहे. तिच्या चेहऱ्यावर जखमा दिसून येत आहेत. इतक्या वेदना आणि यातना सहन करूनही ती आपल्या प्रियकरासोबत राहत होती. श्रद्धाने डॉक्टरकडे अँगर मॅनेजमेंटसाठीही मदत मागितल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर श्रद्धा दिल्लीत शिफ्ट झाली. मात्र, दोघांमधील भांडणं कमी झाली नाहीत. आफताबकडून तिच्यावर अत्याचार सुरूच होते. एकदा तर आफताबनं तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला होता.
आफताब व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याला थांबवण्याचे प्रयत्नही श्रद्धाने केले होते. मात्र, तो नशेच्या इतक्या आहारी गेला होता की अनेकदा तिला मारहाण करायचा. मुंबईत दोघे राहत असताना अनेकदा मारहाण झाली होती. त्याबाबत श्रद्धानं तिच्या मित्रांनाही सांगितलं होतं. त्या त्या वेळी त्यांच्यातील भांडणं मिटवली जात होती.
चॅट मिळवण्याचे पोलिसांचे प्रयत्न
श्रद्धाची निर्घृण हत्या करणाऱ्या आफताबला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देशभरातून होत आहे. आफताबला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, यासाठी सर्व पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस करत आहेत. श्रद्धाचे ज्या शस्त्राने तुकडे केले गेले, त्या शस्त्राचा शोध घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस आफताबकडे याबाबत चौकशी करत आहेत. पण तो पोलिसांची दिशाभूल करत आहे.
आता पोलीस (Delhi Police) आफताबचे चॅट मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. हत्या झाली त्यादिवशी आफताब कुणाकुणाशी चॅटच्या माध्यमातून बोलला हे यावरून उघड होईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.